५ वर्ष प्रगतीच्या वाटावर नेऊ. महायुतीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या सह महायुती ची पत्रकार परिषद

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
महायुतीचे उमेदवार राजेश उत्तमराव विटेकर यांनी पत्रकार परिषदेत पाथरी मतदारसंघातील मतदारांचे अनेक प्रश्न सोडण्याचे वचन पाथरी शहरात शासकीय रुग्णालयाचे नूतनीकरण करून आधुनिक आरोग्य सुविधांसह योग्य डॉक्टरांची व्यवस्था तसेच ग्रामीण भागात नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांची उभारणी करण्याचा येणार आहे मतदारसंघातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी तालुकास्तरावर व्यावसायिक उच्च शिक्षण संस्था स्थापन करण्याचा तसेच नवीन शाळांची उभारणी करून आणि योग्य शिक्षकांची नियुक्ती सुनिश्चित करण्याचा येईल आपल्या मतदारसंघात ग्राम सड़क योजने अंतर्गत देवगाव, नाश्रा, गोंडगाव, गुंज,देवनांद्रा, रेणापुर, वाघाळा, मांडगाव,रामेटाकली, डोंगरगाव, पिंपरी यांसारख्या गावांमध्ये रस्त्यांची पुनर्बाधणी करून जिल्ह्यातील सर्व ग्रामीण भाग चांगल्या रस्त्यांनी जोडण्याचा कामा करण्यात येईल मतदारसंघातील सोनपेठ, मानवत, पाथरी या शहरांमध्ये मध्यवर्ती बस स्टँडचा पुनर्विकास आणि नूतनीकरण करण्यात येणार आहे मतदारसंघातील कालवा सिंचन असलेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी कालव्याच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून देऊ मतदारसंघात शेतकऱ्यांना सिंचनासाठी सुरळीत वीजपुरवठा देण्याचा तसेच कोल्ड स्टोरेज आणि वेअर हाऊस उभारून नानाजी देशमुख संजीवनी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक शेती उपकरणांवर अनुदान देऊ असे महायुतीचे उमेदवार राजेश उत्तमराव विटेकर यांनी पत्रकार परिषदेत पाथरी मतदारसंघातील मतदारांचे अनेक प्रश्न सोडण्याचे वचन दिले या वेळी प्रमुख उपस्थित महायुतीचे उमेदवार राजेश विटेकर पाथरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हरिभाऊ लहाने अनिल भाऊ नखाते संजय कुलकर्णी व पाथरी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे अनेक कार्यकर्ते व पदाधीकारी उपस्थित होते आहे .