२५ वी राष्ट्रीय युवा संसद प्रतियोगिता नवोदय विद्यालय तळोधी (बाळा.)येथे संपन्न

जे. एन. वी.चंद्रपूर यांनी पटकाविला प्रथम क्रमांक
चार राज्यातील विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
दि.१७ जानेवारी २०२४ ला जवाहर नवोदय विद्यालय तळोधी (बाळापुर) ता.नागभीड जि.चंद्रपुर येथे नवोदय विद्यालय समिती,पुणे संस्था ” द्वारे “२५ वी ” राष्ट्रीय युवा संसद प्रतियोगिता कार्यक्रम पार पाडण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोक नेते उपस्थित कार्यक्रमाचे होते,उद्घाटन डॉ. श्यामजी हटवादे (निमंत्रित सदस्य नवोदय समिती दिल्ली) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे माधुरी उदय शंकर (असिस्टंट कमिशनर एन.वि.एस. पुणे ) आणि बि. व्यंकटेश्वरन(डेप्युटी कमिशनर एन. व्ही. एस. पुणे) यांनी परीक्षण केले.

यावेळी नवोदय विद्यालयाचे प्राचार्या मिना मनी यांनी पुष्पगुच्छ शाल श्रीफळ व भेट वस्तू देऊन खासदार अशोक नेते यांचे स्वागत केले.
सदर प्रतियोगिते प्रसंगी नवोदय विद्यालयाच्या ” २५ वी राष्ट्रीय युवा संसद प्रतियोगितेत विद्यार्थ्यांना खासदार अशोक नेते यांनी मार्गदर्शन करतांना म्हणाले की, दुरदुष्टी, चिकाटी, लगन, जिद्द,सहनशीलता यांचा विद्यार्थीनी जीवनात अवलंब करून आत्मसात केले पाहिजे. असा दूरदृष्टीकोनातील विचार खासदार अशोक नेते यांनी व्यक्त करत विदयार्थीना मौलाच उत्कृष्ट मार्गदर्शन केले.
सदर प्रतियोगितेत ओरिसा,केरळ,राज्यस्थान, महाराष्ट्र इत्यादि सहभागी प्रतियोगितेत उपस्थित होते.
नवोदय विद्यालय च्या स्वागताचे विशेषतः
सर्वप्रथम खासदार महोदयांचे व पाहुण्यांचे स्वागत नवोदय विद्यालयाच्या प्रवेश द्वारापासून
ते प्रतियोगितास्थळापर्यत विद्यार्थ्यांनी लेझीम व बँड द्वारे आकर्षणाने साकार करत फुलांचा वर्षाव करीत लोकनृत्य व सलामी अशा विविध आकर्षणाने विद्यार्थी विद्यार्थिनी चांगल्या प्रकारे नृत्य सादर करून पाहुण्यांचं उत्कृष्ट स्वागत केलं.
सदर प्रतियोगितेत जे. एन. व्ही. चंद्रपूर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. विजय टीमचे अभिनंदन जल्लोषात साजरे करण्यात आले.
याप्रसंगी प्रामुख्याने प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. श्यामजी हटवादे,सामाजिक नेते रामचंद्र कामडी, तसेच नवोदय विद्यालयाचे प्राचार्या मिना मन , सहभागी सर्व विद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका, कर्मचारी व पालक वर्ग तथा सर्व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.