ताज्या घडामोडी
वाय. एस. पवार महाविद्यालयात ‘मेरी माटी मेरा देश’

प्रतिनिधीः राहुल गहुकर
नेरी येथील वाय. एस. पवार महाविद्यालयात ‘ माटी को नमन विरोंको वंदन ’ या निमित्याने महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद तथा राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले . तसेच महाविद्यालयाने दत्तक घेतलेल्या ‘खुटाळा’ या गावात रासेयो चे स्वयंसेवक व गावातील नागरिक यांच्या हस्ते शंभर वृक्षाचे वृक्षारोपण करून मातीचे काही नमुने घेण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयातील प्रभारी प्राचार्य मा.श्री. वैद्य सर, रासेयो चे कार्यक्रमाधिकारी श्रीरामे सर , प्रा. डांगे मॅडम प्रा.रामटेके मॅडम तथा खुटाळा गावाचे प्रथम नागरिक सरपंच मृणाली बोरकर मॅडम, उपसरपंच विनोदजी बारसागडे , सुधाकरजी सोनवणे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी दिक्षांत रामटेके , स्वप्नील डांगे , पराग चवरे उपस्थित होते .