ताज्या घडामोडी

बोलेरो पिकअप मधून १० लाख ६० हजाराचा गुटखा जप्त

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

जिंतूर पोलीसांची कारवाई १७ लाख ५८ हजाराचा मुद्देमाल ताब्यात.

जिंतूर येथील पोलीसांच्या पथकाने माऊली मंगल कार्यालय शिवाजी नगर येथे शुक्रवार २२ मार्च रोजी रात्री ११.३० च्या सुमारास कारवाई करत बोलेरो पिकअप वाहन ताब्यात घेतले. सदर वाहनामध्ये १० लाख ५८ हजार ४०० रुपयाचा गुटखा होता. वाहनासह एकूण १७ लाख ५८ हजार ४०० रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. सदर प्रकरणी एकावर जिंतूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि.आनंद बनसोडे, पोलीस अंमलदार मुरकुटे, होमगार्ड बुधवंत, सय्यद अनवर, कामिटे यांच्या पथकाने कारवाई केली. पोलीसांनी एमएच २२ एएन १५८१ या क्रमांकाचे संशयीत वाहन थांबवून त्याची पाहणी केली असता सदर वाहनात गोवा गुटखा मिळून आला. पोलीसांनी या वाहनातून १० लाख ५८हजार ४०० रुपयाचा गुटखा जप्त केला आहे. तसेच ७ लाखाचे एक वाहनही ताब्यात घेतले आहे. सपोनि. आनंद बनसोडे यांच्या फिर्यादीवरून नवनाथ शहाजी डोंबे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि. सय्यद करत आहेत.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close