ताज्या घडामोडी

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांचे खाजगी सचिवांची साई मंदिरास भेट

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

आदरणीय रवि अग्रवालजी मुंबई ,महामहीम राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांचे खाजगी सचिव यांनी साईबाबांचे जन्मस्थान मंदिर पाथरी येथे भेट दिली. त्यांनी परमपूज्य साईबाबांचे श्रद्धापूर्वक दर्शन घेतले. साईबाबांच्या पादुकांचे श्रद्धापूर्वक पाद्यपूजन केले .मंदिर परिसराची पाहणी केली.पाथरी विकास आराखड्याची आस्थेवाईकपणे माहिती घेतली. सिएसआर फंडातून फंड मिळविण्यासाठी प्रयत्न करावे, असे मार्गदर्शन केले. मंदिराच्या उत्तम व्यवस्थेबाबत श्री साई स्मारक व्यवस्थापन मंडळाच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. आदरणीय श्री रवी अग्रवालजी चा सत्कार मंदिराचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन.के. कुलकर्णी यांचे शुभहस्ते करण्यात आला, तसेच आदरणीय श्री रवी अग्रवाल जी यांच्या भगीनींचा सत्कार सौ.छाया कुलकर्णी मंदिर प्रमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी पाथरी नगरपालिकेच्या चिफऑफिसर सौ.कोमल सावरे, वसंतराव नाईक कृषि विद्यापीठाचे हवामान तज्ञ श्री कैलास डाखरे, राजू विश्वमित्रे ,विश्वंभर डावरे ,अरुण दैठणकर वगैरे उपस्थित होते.
अशी माहीती संस्थेचे सचिव तथा कार्यकारी विश्वस्त अॅड अतुल चौधरी यांनी दिली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close