ताज्या घडामोडी

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने प्रचंड मोठ्या प्रमाणात रास्ता रोको आंदोलन

मोठ्या संख्येने शेतकरी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन – कॉ. ज्ञानेश्वर काळे.

जिल्हा प्रतिनीधी:अहमद अन्सारी परभणी

पावसाच्या खंडामुळे तसेच अवेळी पावसामुळे शेतकरी हातचे आलेले पीक गमावून बसले आहेत सोयाबीन, कापूस, मूग ,तूर , पावसा आभावी जळून गेले आहेत त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे.
तर दुसरीकडे फक्त पाथरी तालुका वगळून पिक विमा अग्रीम २५% सर्व जिल्यांना दिला आहे परंतू त्यामधूनही परभणी जिल्हा वगळला आहे.
पिक विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला कसाबसा आधार मिळतो तो आधारही काढून घेण्याचं काम मायबाप सरकारने केले आहे तसेच मराठवाड्यात परभणी आणि बीड वगळता सर्व जिल्ह्याला अतिवृष्टी अनुदान देण्यात आले परंतु हेतूपूर्वक परभणी जिल्हा आणि त्यामधील पाथरी तालुका पूर्णतः वगळण्याचे षडयंत्र राजकीय चोरट्याने केले आहे त्यामुळे त्यांच्यावर रोष व्यक्त करण्यासाठी व त्यांना धडा शिकवण्यासाठीआपला हक्क मिळवण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बंधू एकवटून रास्ता रोको आंदोलन करणार आहे. दि.२३ सप्टे रोजी सेलू कॉर्नर या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे या आंदोलनात सहभागी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सेक्रेटरीकॉ, कॉ.ज्ञानेश्वर काळे
कॉ, नारायण दळवे कॉ, श्रीनिवास वाकणकर कॉ,मुंजा लीपने कॉ,भरत गायकवाड कॉ,तुकाराम शिंदे कॉ,बडे साहब कॉ,गणेश नखाते कॉ, सिकंदर पठाण कॉ, सचिन काळे कॉ,अनिस शेख कॉ,संतोष हरकळ कॉ,विलास दळवे कॉ,शरद झूटे कॉ,अनिता दुधाटे

प्रतिक्रीया : –

  • शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या २५% अनुदानासाठी शासनाला जाग करण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे
  • कॉ. ज्ञानेश्वर काळे (भारतीय कम्युनिस्ट पक्ष ता. सेक्रेटरी)

मागण्या खालील प्रमाणे आहेत : –
१) अतिवृष्टीग्रस्त अनुदान संपूर्ण पाथरी तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट देण्यात यावे.
२) पावसाच्या विलंबामुळे सोयाबीन ,कापूस हातचे गेले आहे त्यामुळे २५% विमा अग्रीम रक्कम विमा कंपनीने त्वरित द्यावी .
३)श्रावणबाळ, संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी निराधार लाभधारकांना गेली सहा महिने झाले मानधन दिले नाही ते त्वरित देण्यात यावे.
४) संजय गांधी निराधार, श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना हेतूपूर्वक डावलण्यात आलेले अर्ज तात्काळ निकाली काडून त्यांना मानधन चालू करा.
५) हेतूपूर्वक निराधारांना त्रास देणाऱ्या माननीय तहसीलदार सुमन मोरे व नायब तहसीलदार यांना निलंबित करा.
६)मंजरत येथील मानव विकास अंतर्गत बस सेवा तात्काळ सुरू करा .
७)सर्व बँकांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज पुरवठा करावा असा तात्काळ आदेश द्या.
८) ऊस लागवडीच्या नोंदी तात्काळ घेण्यात याव्या.
९) रेणुका सुगर्स कारखान्याने ८६०३२ या जातीच्या उसाची लागवड सक्तीची करणे तात्काळ बंद करावे.
१०) पाथरी ते सेलु रस्ता तात्काळ दुरुस्ती करा.
11) नाथ्रा मरडसगाव गोपेगाव वडी रामपुरी ढालेगाव रस्ता काम तात्काळ करा .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close