ताज्या घडामोडी

विठाई बहुउद्देशीय संस्थेची चंद्रपूरात पाणपोई

प्रतिनिधी:रामचंद्र कामडी

सदैव सामाजिक बांधिलकी जपणा-या स्थानिक विठाई बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने जटपुरा गेट परिसरात दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील पाणपोई सुरू करण्यात आली आहे.बहुतेक एप्रिल महिण्यात या ठिकाणी पाणपोई सुरू करण्यात येते पण या वर्षी या पाणपोईला थोडासा विलंब झाला असल्याचे संस्थेच्या प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.
उन्हाळ्यात चंद्रपूरच्या तापमानचा पारा हा वाढलेलाच असतो. अश्या ही परिस्थितीत आवश्यक कामाकरिता काही नागरिकांना घराच्या बाहेर पडावेच लागते दरम्यान येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना पिण्यासाठी थंडगार पाणी मिळावे हा मुळ उद्देश डोळ्यासमोर ठेवून विठाई बहुउद्देशीय संस्थाने पाणपोईची व्यवस्था केली आहे. मातृदिनाचे औचित्य साधत विठाई बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने स्वर्गीय लक्ष्मीबाई उद्धवराव नगराळे यांच्या स्मृति प्रित्यर्थ पाणपोईचे उद्घाटन विठाबाई लक्ष्मणराव काहीलकर यांच्या हस्ते करण्यात आले.


यावेळेस संस्थेचे अध्यक्ष महेश कहिलकर , दिनेश जुमडे, सोनल धोपटे ,ओमप्रकाश मिसार, कल्पक नगराळे ,भारती कश्यप ,प्रीतम रागीट,भारती जिराफे ,माधुरी काहीलकर , शिवानी घटे , सीमा टेकाळे,सुषमा मोकळे, अर्चना मीसार, प्रीती मडावी,कीर्ती नगराळे , नीलिमा मेंडुलकर आदिंची प्रामुख्याने उपस्थिती होती.यासाठी विशेष सहकार्य संतोष थिपे यांचे लाभले . संस्थेच्या या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close