ताज्या घडामोडी

सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाच्या समर्थनात एकवटली ब्रम्हपुरी

दिल्ली येथे चालू असल्याले विद्यार्थी मोर्चाच्या समर्थनात देशभर आंदोलणे काढली जातं आहेत. सोनम वांगचूक यांना जबरजस्ती आंदोलनातून उचलून नेल्या मुळे देशभरात संताप व्यक्त करण्यात आले. त्यानंतर CJP प्रमुख अभिजित दिपके यांनी आंदोलनाजी जबाबदारी घेतली आणि सांगितले की जे व्यक्ती दिल्ली येऊ शकत नाही त्यांनी आपल्या गावात एकत्र येऊन आंदोलन करून समर्थन दाखवावे. हे एकटाच ब्रम्हपुरी येथे श्री. प्रशांत डांगे यांच्या नेतृत्वात आंदोलनासाठी मीटिंग घेण्यात आली. आणि आज 20-07-2026 ला 1 ते 4 वाजता दरम्याने प्रदर्शन करण्याने ठरले. आणि आज सकाळ पासून सर्व विद्यालयीन आणि महाविद्यालईन विद्यार्थी आणि सर्व नागरिक एकवटले आणि नारे देऊन जोरदार प्रदर्शन करण्यात आले.
सोनम वांगचुक यांचा दिल्लीतील जंतर-मंतरवरील संघर्ष आणि ब्रम्हपुरीसारख्या शहरांत आपल्या हक्कांसाठी एकवटलेले नागरिक, हे अधोरेखित करतात की, जेव्हा जेव्हा समाजातील घटक अन्यायाविरुद्ध आणि आपल्या न्याय्य मागण्यांसाठी एकजूट होतात, तेव्हाच खऱ्या अर्थाने लोकशाहीत बदलाची पहाट उजाडते. हा जनक्षोभ केवळ एका ठिकाणचा नसून, तो देशातील प्रत्येक नागरिकाच्या जागृत मानसिकतेचे आणि परिवर्तनाच्या जिद्दीचे प्रतीक आहे.”

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close