महाशिवरात्रीनिमित्त परमपूज्य श्रीसाईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी येथे भरगच्च कार्यक्रम

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
परमपूज्य श्रीसाईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी येथे महाशिवरात्रीनिमित्त रुद्राभिषेक संपन्न झाला. पहाटे साडेपाच वाजता श्रीसाईबाबांची काकड आरती झाली नंतर वेदमूर्ती उमेश गुरू जोशी सावरगावकर व अजय गुरु पाथरीकर शास्त्री यांच्या शुभहस्ते परमपूज्य श्रीसाईबाबांचे मंगलस्नान झाले.मंगल स्नानानंतर वेदशास्त्रसंपन्न उमेश गुरू यांनी पादुका पूजन केले तसेच वेदमूर्ती उमेश गुरू जोशी यांच्या मंगल वाणीतुन रुद्रपठण करण्यात आले. त्यानंतर दुबई येथील परम साईभक्त श्रद्धा गुरुस्वामी यांनी विशेष महाशिवरात्रीसाठी श्रीसाईबाबांना देणगी दिलेले व्याघ्रांबर सारखे वस्त्र परिधान करण्यात आले, व त्रिशूळ, डमरूळ सहित बाबांची पूजा करण्यात आली.
दुपारी बारा वाजता परमपूज्य श्रीसाईबाबांची महाआरती झाल्यानंतर परभणी येथील परम साईभक्त सौ.अंजली जाधव व इंग्लंड येथील परम साईभक्त कुमारी आदिती रत्नपारखी यांच्या वतीने परमपूज्य श्रीसाईबाबांना महानैवेद्य झाला. आणि रात्री बारा वाजता परमपूज्य श्रीसाईबाबांच्या घरातील महादेवाला कार्यकारी अधिकारी मा.अॅड. श्री मुकुंदराव चौधरी यांचे शुभहस्ते रुद्राभिषेक करण्यात आला सदर पूजेचे पौराहित्य श्री.योगेश गुरु इनामदार, वाळुजकर शास्त्री यांनी केले. प्रसंगी मंदिर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ना.के. कुलकर्णी उपस्थित होते.
अशी माहिती मंदिर प्रमुख सौ छाया कुलकर्णी यांनी दिली.