ताज्या घडामोडी

कमलापूर येतील नागरिकांना मिळणार शुध्द पिण्याचं पाणी

जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभहस्ते टाकीच्या लोकांर्पण कार्यक्रम सम्पन्न..!!

तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी

अहेरी तालुक्यातील ग्राम पंचायत कार्यालय कमलापूर येते जिल्हा परिषद बांधकाम विभाग गडचिरोली अंतर्गत शुद्ध पिण्याचं पाण्याची विहीर व टाकी मंजूर करण्यात आली. सदर टाकीच्या बांधकाम कामं पूर्ण झाले असून सम्पूर्ण गांवात ग्राम पंचायत अंतर्गत १५ व्या वित्त निधीतून नळ जोडणी करण्यात आली असल्याने कमलापूर गावातील नागरिकांना शुध्द पिण्याचं पाणी मिळणार आहे.
सदर पिण्याचं पाण्याचा टाकीच्या व नळ सुरू करून आज जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते लोकांर्पण करण्यात आली आहे.
यावेळी अहेरी पंचायत समितीचे सभापती श्री.भास्कर तलांडे,जिल्हा परिषद सदस्य,श्री.अजय नैताम,पंचायत समिती सदस्या सौ.सुरेखा आलाम,कमलापूरचे सरपंच श्रीनिवास पेंदाम,उपसरपंच सचिन ओल्लेटीवार,रेपनपलीचे सरपंचा सौ.लक्ष्मी आत्राम,उपसरपंच श्री.विलास नेरला,ग्राम पंचायत सदस्य इंदू पेंदाम,प्रणाली मडावी,लक्ष्मी सड़मेक,लक्ष्मण कोडापे,कलावती येजूलवार,प्रतिष्ठित नागरिक चौधरी काका,सुदीप रंगूवार,उमेश भीमनपलीवार,श्रीनिवास राऊत,महेश मडावी,माधव कूळमेथे,प्रमोद कोडापे,प्रशांत गोडसेलवार,प्रकाश दुर्गे,सावित्री चिप्पावार, व गावातील महिला व नागरिक उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close