मा. रत्नाकररावजी गुट्टे (खा.)औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने 07 जिल्ह्य़ामधुन मिळवला प्रथम क्रमांक

( परभणी, जालना, बीड, उस्मानाबाद, हिंगोली, नांदेड, लातूर )
जिल्हा प्रतिनीधी:अहमद अन्सारी परभणी
डिसेंबर २०१९ मध्ये DGET दिल्ली द्वारे देशातील सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थाची गुणवत्ता तपासणी करण्यात आली होती. यामध्ये परभणी, जालना, बीड, उस्मानाबाद, हिंगोली, नांदेड, लातूर या सात जिल्ह्य़ामधुन सुधा-रत्न चॅरिटेबल ट्रस्ट संचलित मा. रत्नाकररावजी गुट्टे (खा) औद्योगिक प्रशिक्षण संस्था वडगाव स्टेशन ता. सोनपेठ जि. परभणी या संस्थेने प्रथम क्रमांक मिळविला आहे. याबद्दल सातही जिल्ह्य़ामधुन संस्थेचे कौतुक केले जात आहे.
DGET दिल्ली द्वारा देशातील सर्वच शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची गुणवत्ता तपासणी करण्यात आली त्यामध्ये श्रेणी ठरवताना संस्थेमध्ये मिळणा-या मुलभुत व भौतिक सुविधा संस्थेची जागा, सुसज्ज इमारत, पिण्याचे शुद्ध पाणी, खेळाचे मैदान, अधुनिक वर्कशॉप, बसण्याची व्यवस्था, सौचालय व इतर. प्रशिक्षणार्थी प्रवेश, प्रशिक्षणार्थी उपस्थिती, घेतले जाणारे प्रात्याक्षिक, अनुभवी निदेशक, संस्थेच्या निकालाची टक्केवारी, संस्थेने राबवलेले सामाजिक उपक्रम, व्याख्याने, प्रशिक्षण शिबिरे, रोजगार मेळावे, प्रशिक्षणार्थ्याना मिळालेली शिकाऊ उमेदवारी व संस्थेतुन प्रशिक्षण पुर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्याना मिळालेली शासकिय नोकरी, खाजगी नोकरी, व्यवसाय यांची टक्केवारी या अशा अनेक बाबींचा विचार करून संस्थेला गुणवत्ता श्रेणीमध्ये प्रथम क्रमांक दिला आहे.
या कौतुकस्पद कामगिरी बद्दल संस्थेच्या अध्यक्षा सौ. स्वाती गुट्टे यांनी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.दिपक फुंदे सर, प्राचार्य ईश्वर सर, गटनिदेशक, सहाय्यक प्रशासकीय, व सर्व निदेशक आणि संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.