ताज्या घडामोडी

बाजारतल,नाट्यगृह,जलकुंभचे उदघाटनाचे नाटक करणार्यांविरोधात MIM स्टाईल नूसार आंदोलन करणार – शेख रशिद

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

माजलगाव- गल्ली ते दिल्ली पर्यंत राष्ट्रवादीची सत्ता असलेले आमदार ,नगराध्यक्ष डोळ्यासमोर ठेवून बाजारतळ ,नाट्यगृह, जलकुंभ ची फिता कापत फिरत होते पण प्रशासन बसल्यानंतर बाजारपेठ, नाट्यगृह, जलकुंभचे काहीही काम झालेलं नाही त्यामुळे हे काम लवकरात लवकर करा नसता MIM स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा एम आय एम चे शहराध्यक्ष शेख रशिद यांनी केला.
नगर परिषदेअंतर्गत विविध कामांची उद्घाटने डिसेंबर महिन्यात उरकण्यात आली. यामध्ये बाजारतळ, नवीन पाण्याची टाकी, नाट्यगृह आदीसह अनेक कामांचा समावेश होता. या काळात आमदार सोळंके यांनी फीत कापण्याचा जणू धडाकाच लावला होता. मोठमोठ्या वल्गनांच्या गजरात घडाघड बद्घाटने करण्यात आली. परंतु अजून एकाही कामासाठी पर साधी कुदळदेखील पडली नाही त्यामुळे येणाऱ्या नप निवडणुकी डोळ्यासमोर ठेवूनच उद्घघाटन करण्यात आले असा आरोप MIMचे शहराध्यक्ष शेख रशिद यांनी केला आहे.
माजलगाव नगर परिषदेच्या सभासदांचा कालावधी ४ जानेवारी २०२२ रोजी संपुष्टात आला. त्यानंतर या ठिकाणी येथील उपविभागीय अधिकारी नीलम बाफना यांच्याकडे प्रशासक म्हणून कारभार आला. डिसेंबर २०२१ मध्ये माजलगाव शहरातील विविध कामांचा नुसता धडाका सुरू होता. त्यातही ज्या कामांच्या निविदा व इतर बाबी पूर्ण व्हायच्या राहिल्या होत्या. त्या कामांचीही भूमिपूजने घाईगडबडीत नदीच्या बाजूला नगरपालिकेच्या जागेत बाजारतळासाठी जागा देण्यात आली. बाजारतळ विकासासाठी ९५ लाख रुपयांची निविदादेखील काढण्यात आली. परंतु तत्पूर्वीच या कामांचे उद्घाटन मात्र उरकून घेण्यात आले. मंजरथ रोड या ठिकाणी शहरासाठी ठिकाणी नवीन जलकुंभचे उदघाटन करुन तसेच काम पडून आहे.
नाटयगृहाच्या कामाचे भूमिपूजन तर झाले मात्र आता ही जागाच आरक्षित असल्याचा आक्षेप प्राप्त झाला आहे हे सर्व पाहता लवकर काम करण्यात यावे नसता MIM स्टाईलनूसार आंदोलन करण्यात येईल ह्याची नोंद करावी असा इशारा प्रसिद्धीपत्रकात केला आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close