ताज्या घडामोडी

ऐतिहासिक व धार्मिक पाचशे स्थळावर सामूहिक महा श्रमदान सोहळ्याचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन मौनगिरी महाराज यांचे उत्तराधिकारी श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज वेरूळ जय बाबाजी भक्त परिवार यांचे वतीने रविवार दिनांक 4 जून 23 रोजी भारतातील ऐतिहासिक व धार्मिक पाचशे स्थळावर सामूहिक महा श्रमदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्या अंतर्गत पाथ्री येथे जय बाबाजी भक्त परिवार साईबाबा जन्मस्थान मंदिर व पाथरी नगरपालिकेच्या वतीने महाश्रमदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. साईबाबा जन्मस्थान मंदिर,विठ्ठल मंदिर,सोमेश्वर मंदिर, रेणुका मंदिर वगैरे ठिकाणी महाश्रमदान स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तेजराव देवराव मोरे जय बाबाजी भक्त परिवार यांनी स्वच्छता अभियानाचे सुयोग्य नियोजन केले होते. साईबाबा जन्मस्थान मंदिराच्या व्यवस्थापन मंडळाच्या वतीने एडवोकेट अतुल दिनकरराव चौधरी व्यवस्थापकीय विश्वस्त यांनी श्रमदान प्रमुख तेजराव देवराव मोरे यांचा यथोचित यथोचित आदर सत्कार केला. श्री श्री 1008 महा मंडलेश्वर स्वामी शांतिगिरी जी महाराज यांना परमपूज्य श्री साईबाबा यांचे जन्मस्थान पाथरी येथे भेट देणे बाबत व्यवस्थापन मंडळाच्या वतीने एडवोकेट अतुल दिनकरराव चौधरी व्यवस्थापकीय विश्वस्त यांनी सादर निमंत्रित केले. या कामी पाथरी नगरपालिकेने मोलाचे सहकार्य केले.
अशी माहिती साईबाबा जन्मस्थान मंदिराचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close