ताज्या घडामोडी

स्वराज्य ध्वज यात्रेचे भद्रावती येथे स्वागत

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

कर्जत जामखेड चे युवा आमदार व राज्याचे उद्धोन्मुख नेतृत्व रोहित पवार यांच्या नेतृत्वात देशातील सगळ्यात लांब उंच व हिंदवी स्वराज्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या भगव्या ध्वजाचे भद्रावती जैन मंदिर येथे जंगी स्वागत करण्यात आले.
स्वागताला राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रतिनिधी मुनाज शेख , असंघटित कामगार जिल्हा अध्यक्ष फय्याज शेख , राष्ट्रवादी युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष अभिजित कुडे , महीला शहर अध्यक्ष भद्रावती साबिया देवगडे युवक शहर उपाध्यक्ष सूरज भेले , चंद्रपूर तालुका अध्यक्ष राहुल आवडे , पियूष भोगेकर, रोशन कोमरेडीवार, निलेश जगताप , सौरभ घोटेकर यांच्यासह मोठया प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुस्वराज्याचा स्थापनेकरिता जिकरीने खर्ड्याजवळ शिवपटन किल्ला काबीज केला होता. या कील्ह्याजवळ हिंदवी स्वराज्याची शेवटाची लढाई झाली होती. शत्रूला धूळ चारत आपल्या शुर मावळ्यांनी त्यावर भगवा फडकाविला होता.
या कील्ह्याच्या आवारात प्रेरणा, ऊर्जा देणारा भव्य स्वराज्य ध्वज स्तंभ उभारण्यात येत आहे दसऱ्याच्या मुहूर्तावर या स्वराज्य ध्वजाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. तत्पूर्वी महाराष्ट्रसह देशातील विवीध महत्वाच्या ७४ धार्मिक ,आध्यात्मिक स्मारके गडकिल्ले आदी ठिकाणीं ध्वजाचे पूजन होणारं आहे .१२ हजार किलोमीटर सुस्वराज्य यात्रा प्रवास करणार आहे .७४ प्रेरणास्थान ,३७ दिवस,३६ महाराष्ट्रतील जिल्हे आणि देशातील ६ राज्य असा ध्वजाचा प्रवास राहणार आहे.
स्वराज्य ध्वजाचे महत्व
स्वराज्य ध्वज लाल व पिवळ्या रंगाच्या मिश्रणातून तयार झालेला भगवा रंगाचा आहे. तो ऊर्जा, भक्ती ,शक्ति आणि आनंदाचे प्रतिक मानले जाते हिंदवी स्वराज्याची विजयाची शेवटची लढाईला नगर जिल्हयातील कर्जत– जामखेड मधील शिवपत्तन किल्ल्याभोवती झाली . त्यामुळे इथे या यात्रेचा समारोप होणार आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close