ताज्या घडामोडी

जय सेवा महिला मंडळने फुलविले वृद्धांच्या चेहऱ्यांवरती हास्य

प्रतिनिधी:रामचंद्र कामडी

आजच्या या धकाधकीच्या जीवनात सयुक्त कुटुंबाची संकल्पना हि लोप पावत आहे. परिणामी न्यूक्लियर फॅमिलीची संकल्पना पुढे येत आहे. ज्यामुळे आजच्या पिढीला आपले आजी-आजोबाचे प्रेम, त्यांचा सहवास, त्यांच्या गोष्टी, आदिं पासून त्यांना वंचित व्हावे लागत आहेत. आज पती-पत्नी या दोघाला करियरच्या नावाने घरामध्ये वयोवृद्ध व्यक्ती नकोसे वाटतात परिणामी ते आपल्या आई-वडिलांना हे वृध्दाश्रमात नेऊन ठेवतात.त्यातच वृद्ध हे आपल्या कुटुंबाच्या सुखापासून वंचित होतो. असंच काही चित्र आपल्या चंद्रपूर शहरात देखील बघायला मिळते. अगदी चंद्रपूरला लागूनच असलेला देवाडा या गावात सुभाष शिंदे यांचे डेबु सावली या नावाने वृद्राश्रम आहे. या वृध्दाश्रमच्या माध्यमातून सुभाष शिंदे यांनी एकाकी पडलेल्या वृद्धांना कौटुंबिक आनंद देण्याचा प्रयत्न करत असतात. यालाच प्रतिसाद देत चंद्रपूर व चंद्रपूरच्या बाहेरील व्यक्ती हे ह्या डेबु सावली वृध्दाश्रमात आपल्या सह कुटुंबांसोबत येतात आणि या एकाकी पडलेल्या वृद्धांसोबत एक दिवस घालवून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचा प्रयत्न करतात.
असाच छोटासा प्रयत्न हा जय सेवा महिला मंडळ, चंद्रपूरच्या महिलांनी नुकताच डेबु सावली वृद्राश्रमात जाऊन केला. जय सेवा महिला मंडळच्या सर्व महिलांनी त्यांच्या सोबत काही क्षणच नाही घालविले तर त्यांचे आरोग्य विषयी सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. महिला मंडळच्या वतीने त्यांना दैनदिन लागणाऱ्या वस्तु पुरविण्याचा एक प्रयत्न केला. छोट्याखानी या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता संगीता दुर्वे, मालती कोरांगे, प्रीती मेश्राम, रेखा टेकाम, अन्नपूर्णा बावनकर, हेमलता खोब्रागडे, रूपाली रायपुरे, अनिता पुसम, वैशाली जीवतोडे, उषा तलांडे, सौभाग्य, कुडुमते, वर्षा मडावी, वर्षा धडांजे, उज्वला साठवणे, पायल, आदिंनी परिश्रम घेतले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close