ताज्या घडामोडी

नेरी -शिरपूर रोडवर दुचाकी व बस चा भीषण अपघात

ग्रामीण प्रतिनिधी: सुनिल गेडाम सिरपूर

तालुका मुख्यालयातील नेरी तळोधी रोडवर आज चिमूरवरून तळोधी साठी येणारी बस व दुचाकी यामध्ये समोरासमोर धडक होऊन मोठा भीषण अपघात झाला. दुचाकी वाहनचालक शिरपूर जवळील लोहारा गावचा नागरिक आहे.आज नेरी येथील आठवडी बाजारानिमित्याने तो बाजार करण्यास जात होता. शिरपूर पासून काही अंतरावर वळन असल्यामुळे नेरीवरून येणारी चिमूर तळोधी बस दुचाकी चालकास न दिसल्यामुळे आणि बस अचानक जवळ आल्याने दुचाकी वाहन चालकाचे गाडीवरून नियंत्रण सुटले व त्याने आपली दुचाकी सरळ बसमध्ये घुसविलीअसे घटना स्थळावरील उपस्थित लोकांमध्ये बोलल्या जात होते.त्याच्या डोक्याला व पायाला जब्बर मार असून त्याचा उजवा पाय पूर्ण निकामी झाला आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close