ताज्या घडामोडी

आनंद निकेतन महाविद्यालयाच्या खेळाडूंना राष्ट्रीय मिनी गोल्फ स्पर्धेमध्ये 2 रौप्य आणि 4 कांस्य पदक

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

सुरेश ज्ञान विहार विद्यापीठ, जयपूर येथे दि.16 ते 19 एप्रिल दरम्यान आयोजित अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्तरीय मिनी गोल्फ स्पर्धेमध्ये आनंद निकेतन महाविद्यालयाच्या खेळाडूंनी गोंडवाना विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करत उत्कृष्ट कामगिरी केली आणि आपला विजय प्रस्तापित केला.
धीरज नहाले , संकेत धोबे,चेतन जेऊरकर यांनी स्ट्रोक इव्हेंट मध्ये कांस्य पदक पटकावले.तर कोमल मिलमीले हिने रौप्य पदक पटकावले तसेच लक्ष्मी खिरटकर,अर्चना तोडसम यांनी फेअरवे सिंगल इव्हेंट मध्ये कांस्य आणि रौप्य पदक पटकावले.या सर्व खेळाडूंनी आपल्या उत्तम खेळाचे प्रदर्शन करत हा विजय प्राप्त केला.
विजयी सर्व खेळाडूंचे आनंद निकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे, उपप्राचार्या प्रा. राधा सवाणे आणि शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख प्रा. तानाजी बायस्कर यांनी अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close