ताज्या घडामोडी

दादासाहेब टेंगसे यांची सर्व शेतकऱ्यांना तात्काळ पीकविमा मिळण्याची मागणी

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

सर्व शेतकऱ्यांना तात्काळ पीकविमा मिळावा अशी मागणी कृषी सभापती दादासाहेब टेंगसे यांनी कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केली व तात्काळ आज कृषी विद्यापीठ परभणी येथे कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी अधिकारी व विमा कंपनी अधिकारी यांची पीकविमा संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली.यावेळी कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी विमा कंपनी यांना तात्काळ आठ दिवसाच्या आत शेतकऱ्यांना विमा रक्कम जमा करावी असे आदेशीत केले व कंपनी ने कार्यवाही नाही केली तर कारवाई करण्याचा सूचना जिल्हाधिकारी यांना केल्या.यावेळी आमदार राहुल पाटील साहेब,जिल्हाधिकारी अजल जी गोयल,कृषी सभापती दादासाहेब टेंगसे,कुलगुरू डॉ.अशोक ढवण,कृषी अधिकारी ममदे,आळसे,शेख हे उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close