ताज्या घडामोडी

बोर्डा झूल्लूवार येथे कोविड लसीकरण

ग्रामीण प्रतिनिधी : अंकुश खोब्रागडे गोवर्धन

आज दिनांक 23 एप्रिल रोजी पोंभूर्णा तालुक्यातील बोर्डा झूल्लूवार येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत 58 पुरुष 47 महिला एकूण 105 लोकांचे यशस्वी लसीकरण झाले. लसीकरण केंद्राचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार यांच्या हस्ते करण्यात आले. गावातील प्रत्येक व्यक्तीचे लसीकरण करण्याची जबाबदारी सरपंचाची असेल असे शासकीय आदेश निर्गमित करण्यात आले होते. त्याच आदेशानुसार बोर्डा झूल्लूवार येथील सरपंच गौतम रामटेके व उपसरपंच संजय ढोंगे व ग्रामपंचायत सदस्यांनी गावातील 45 वयोगटातील लोकांना लसीकरण करण्यास प्रोत्साहित केले. गावात प्रत्येकांना कोविड लस घेण्याचे आव्हान राहुलभाऊ संतोषवार यांनी केले आहे. यावेळी उपस्थित राकेश गव्हारे सामाजिक कार्यकर्ता, सातपूते मॅडम CHO प्राथमिक आरोग्य केंद्र पोंभूर्णा, भंडारे आरोग्यसेविका, पारधी आरोग्यसेवक, तुमे आरोग्यसेविका, ग्रामसेवक पेंदोर, पंचशीला रामटेके आशा वर्कर, विकास रामटेके पोलीस पाटील, जुमनाके सर मुख्याध्यापक, अनिल नेताम, अमित बुरांडे व गावातील नागरिक उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close