ताज्या घडामोडी

भाजपचे 12 आमदार निलंबन निषेधार्थ भाजप तालुका चिमुर चे तहसीलदार मार्फत राज्यपाल यांना दिले निवेदन

ग्रामीण प्रतिनिधी : रामचंद्र कामडी नेरी

महाविकास आघाडी सरकारने ओबीसी प्रश्नावर विरोधी पक्ष भाजप ला सभागृहात बोलू दिले नाही. महाविकास आघाडी सरकारने नियोजन बद्ध षडयत्र करून 12 भाजपचे आमदार निलंबित केले. ओबीसी ना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शन सूचनांचे पालन करण्यासाठी विधानसभा मध्ये विरोधी पक्षाला बोलू दिले नाही लोकशाही मध्ये जनतेला बोलण्याचा अधिकार आहे. विधानसभेत भाजप आमदारांचे खच्चीकरण कसे करता येईल असे एक षडयंत्र रचल्या गेले आणि 12 आमदाराना निलंबित केल्याच्या निषेधार्थ भाजप तालुका चिमूर च्या वतीने राज्याचे राज्यपाल यांना तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले.
महाविकास आघाडी सरकारचा निषेध व्यक्त करीत राज्यपाल यांना तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले असून यावेळी भाजप प्रदेश सदस्य डॉ श्यामजी हटवादे जीप उपाध्यक्ष रेखाताई कारेकर भाजपचे जिल्हा सचिव राजू देवतळे, तालुका अध्यक्ष राजु पाटील झाडे, महिला तालुका अध्यक्ष मायाताई ननावरे माजी सभापती प्रकाश वाकडे, जीप सदस्य मनोज मामीडवार पस सदस्य पुंडलीक मत्ते पस सदस्य प्रदीप कामडी भाजप शहर अध्यक्ष सचिन फरकाडे समीर राचलवार शहर महामंत्री सुरज नरुले कृऊबास संचालक कलिम शेख, रमेश कंचर्लावार प्रशांत चिडे, अर्जुन थुटे, पराग अंबादे, राजु बोडणे हरिश पिसे गणेश मेहरकुरे मंगेश भुसारी उपसरपंच सचिन डाहुले सचिन बघेल संदीप पिसे नरेंद्र पंधरे सरपंच प्रफुल कोलते निखिल भुते मनी रॉय महादेव कोकोडे विकी कोरेकर अरुण लोहकरे देवा मुंगले अविनाश बारोकर अनिल शेंडे विलास कोराम सावन गाडगे निलेश गभने भाजप महिला आघाडी तालुका अध्यक्ष मायाताई ननावरे, गीता लिंगायत ज्योती ठाकरे भारती गोडे छायाताई कंचर्लावार, अलका बोरतवार नाजमा शेख नलु शेंबडे नीता लांडगे मनीषा कावरे कल्याणी सातपुते आदी उपस्थित होते
दरम्यान भाजपच्या नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करीत घोषणा देऊन निषेध व्यक्त करण्यात आला

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close