ताज्या घडामोडी
अँड.नितीन उध्दव रामटेके यांची नोटरी पदावर नियुक्ती

कायदेशीर दस्तऐवज तयार करावयाचे असल्यास नागरिकांनी संपर्क करावे..
मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे
नोटरी अधिनियम १९५२ (१९५२/५३) ला अनुसरून चिमूर येथील अँड.नितीन उध्दव रामटेके यांची भारत सरकार द्वारे नोटरी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
अँड.नितीन उध्दव रामटेके यांची ५ वर्षांपर्यंत नियुक्ती असून त्यांना चिमूर दिवाणी आणि फौजदारी न्यायालयातंर्गत नोटरी म्हणून व्यवसाय करण्याची परवानगी भारत सरकारच्या द्वारे देण्यात आली आहे.
यामुळे नोटरी संबंधाने काही कायदेशीर दस्तऐवज तयार करावयाचे असल्यास अँड.नितीन उध्दव रामटेके यांची चिमूर तालुक्यातील नागरिकांनी भेट घ्यावी असे त्यांनी कळविले आहे.