ताज्या घडामोडी

अखेर मृत्यू समोर आदित्य हरला

वरोरा तालुक्यात शोककळा.

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

मकर संक्रांति चा महिना म्हणजे बच्चे पार्टीचा आवडता जानेवारी महिना. या महिन्यात लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्व पतंग उडविण्यात व्यस्त असतात. हा छंद असतो. मात्र हा छंद कुणाच्या जीवावर बेतू शकतो अशी घटना 28 जानेवारीला वरोरा तालुक्यातील बोर्डा या गावी घडली. सकाळी नऊ वाजता दरम्यान बोर्डा येथील बारा वर्षीय मुलगा आदित्य उमेश येटे हा घराच्या जिन्यावरून पतंग उडवीत असताना पतंगीचा मांजा चा स्पर्श हा घरावरील उच्च विद्युत प्रवाह असलेल्या ताराला झाला आणि होत्याचे नव्हते झाले.
मांजाचा तो स्पर्श आणि मोठा स्फोट त्याठिकाणी झाला. त्यामुळे आदित्य हा मोठ्या प्रमाणात भाजला गेला.
आदित्य च्या आई वडिलांनी आणि नातेवाईकांनी आदित्यला तात्काळ चंद्रपुरातील खासगी दवाखान्यात दाखल केले. आदित्य उपचाराला प्रतिसाद देत नव्हता. त्याला तात्काळ नागपुरात रेफर करण्यात आले घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्यामुळे वडिलांनी मदतीसाठी हाक लावली. समाजातील काही दानशूर व्यक्तींनी मदतही केली संस्थांकडूनही मदत मिळाली काही समाजसेवक या कामी लागून आदित्यला मदत कशी मिळेल यासाठी झटू लागले आणि उपचार सुरू झाला. मात्र मृत्यूशी झुंज देताना आदित्य अपयशी ठरला. तब्बल 23 दिवसांनी आदित्यचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.आदित्यच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close