ताज्या घडामोडी

डोमा येथे राष्ट्रीय ओबीसी महीला व पुरुष महासंघाची शाखा गठीत

महिला अध्यक्ष पदी सौ चंदा गोहने यांची तर रवि सेलोरे यांची पुरुष महासंघ पदी निवड

तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुर

ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना व्हावी. जनगणनेत ओबीसी चा काँलम निर्माण व्हावा व ओबीसी समाजाची चळवळ तयार करण्यासाठी डोमा येथे राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाची शाखा व पुरुष राष्ट्रीय ओबीसी महासंघ ची शाखा ग़ठीत करण्यात आली. ओबीसी समाजाला संविधानीक अधिकार मिळावा. ओबीसी समाजाला आरक्षण मिळाले पाहीजे यासाठी महिला सक्षमिकरणाची गरज आहे या हेतूने शाखा गठित करण्यात आली

राष्ट्रीय ओबीसी महीला महासंघ शाखा डोमा च्या अध्यक्ष पदी सौ चंदाताई गोहने यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष पदी सौ श्रीदेवीताई निकेसर यांची निवड करण्यात आली. सचिव पदी सौ कुसुमताई सेलोरे यांची निवड करण्यात आली. सहसचिव पदी सौ अंतकलाताई दहिकर कार्याध्यक्ष पदी सौ शालुताई लांजेवार यांची निवड करण्यात आली. तर कोषाध्यक्ष पदी सौ माधुरीताई सेलोरे यांची निवड करण्यात आली.
तर पुरुष राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ अध्यक्ष पदी रविजी सेलोरे, उपाध्यक्ष पदी बबनजी हजारे,सचिवपदी किसनजी मुंडने , कार्याध्यक्ष पदी भास्करजी चौधरी, कोषाध्यक्ष पदी संजयजी किरीमकर, सहसचिव पदी कवडुजी निकेसर यांची निवड करण्यात आली.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री रामदासजी कामडी , प्रमुख पाहुणे म्हणून कवडूजी लोहकरे ,पुष्पाताई हरने , भावनाताई बावनकर ,अक्षय लांजेवार ,पुष्पाताई सातपुते, डोमा ग्रामपंचायत सरपंच अल्काताई वाकडे , ग्रामपंचायत सदस्य विकास लांजेवार, काशिनाथ दुर्गपाल , श्रीकृष्ण जिल्हारे , अतुल सेलोरे,कवडू निकेसर उपस्थित होते. सर्व नवनिर्वाचित पदाधिका-याचे अभिनंदन करण्यात आले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close