ताज्या घडामोडी

बिनविरोध निवडून आलेल्या अवघ्या २१ वर्ष वयाच्या सदस्याचा सत्कार

तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे

शंकरपूर येथून जवळच असलेल्या गट ग्रामपंचायत, जवराबोडी अंतर्गत जवराबोडी आणि आसोला या दोन गावांचा समावेश आहे.
तसेच ७ सदस्यीय पॅनल असून एकूण ३ वार्ड आहेत.
त्यापैकी वार्ड क्रमांक ३ मधून आसोला
ग्रमवासिय सुशिक्षित सौरभ चुडामान भाशारकर (वय २१ वर्ष) (शिक्षण B.A.) यांची सर्व मताने बिनविरोध निवड करण्यात आली.

त्याबद्दल आसोला ग्रामवासियानी गावात सत्कार समारंभ व पुढील वाटचाली करिता शुभेच्छा देण्यासाठी अभिनंदन पर कार्यक्रम आयोजित केला होता.
कार्यक्रमप्रसंगी उमेदवाराने गावकऱ्यांचे आभार मानले आणि गावकऱ्यांच्या विश्वासास योग्य अशी कामगिरी करेल अशी ग्वाही दिली.
या कार्यक्रमा प्रसंगी गावातील सगळे रहिवासी उपस्थित होते..

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close