ताज्या घडामोडी

तीन क्विंटल कापुस जळुन खाक

तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे

चिमुर तालुक्यातील खडसंगी जवळील अमरपुरी या गावात दि. १३ / ११ / २०२० रोज शनिवार ला राविन्द्र रामभाऊ सातपैसे यांचे तीन क्विंटल कापुस जळुन खाक झाले .
प्राप्त माहीती नुसार रविन्द्र सातपैसे यांनी १० क्विंटल कापुस एका खोलीमध्ये ठेवले होते शनिवारी सांयकाळी ७ वाजता च्या सुमारास त्या खोलीत आग लागल्याचे लक्षात आले आग विझवण्यासाठी घरच्यांनी आरडा ओरड केली असता गावकरी आग विझवायला धावुन आले परंतु आग आटोक्यात येई पर्यंत जवळपास तीन क्विंटल कापुस जळुन खाक झाले त्या खोलीत इलेक्ट्रीक शॉट सर्किट ने आग लागली असे गावकऱ्यांचे म्हणने आहे. तीन क्विंटल कापुस जळल्याने रविन्द्र सातपैसे यांचे खुप नुकसान झाले आहे .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close