ताज्या घडामोडी

पाथरीत मोफत आरोग्य तपासणी शिबिर

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा उपक्रम.

जिल्हा प्रतिनिधी :अहमद अन्सारी परभणी

परभणी जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आरोग्य धनसंपदा अभियान अंतर्गत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पाथरी येथे शांताबाई नखाते विद्यालय शिवाजीनगर येथे २२ जुलै रोजी सकाळी १०:१० वा. मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजीत करण्यात आले आहे.
या शिबिराचे उद् घाटन आमदार बाबाजानी दुर्राणी यांचे हस्ते होणार असुन अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ.भावनाताई अनिलराव नखाते यांची उपस्थिती राहणार आहे तर प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय अधिक्षक डॉ.एस.एन.वाघ, परभणी येथील मेंदु व मणके विकार तज्ञ डॉ.श्रीपाद अंभोरे,जालना येथील एम.डी मेडीसीन डॉ.सुरज तौर ,तज्ञ डॉक्टर्स म्हणुन
डॉ.अपुर्व सोनी,डॉ.विनायक इंगळे, डॉ.पंकज दरक, डॉ.आर.एन.इक्कर डॉ.सारिका कुलकर्णी,जयश्री मोगरे,शेख सलीम यांची उपस्थिती राहणार आहे.तरी जास्तीत जास्त नागरीकांनी या मोफत शिबीरात आपली तपासणी करून घ्यावी असे अवाहन परभणी जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या पदाधिकारी यांनी केले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close