ताज्या घडामोडी

डॉ . प्रणिल पत्रिवार यांच्या चारचाकी वाहनावर कोसळले झाड

डॉ.पत्रीवार थोडक्यात बचावले

ग्रामीण प्रतिनिधी :महेश शेंडे विठ्ठलवाडा

गोंडपीपरी तालुक्यातील
ग्रामीण रुग्णालयाच्या पटांगणात आज (दि.21) बुधवारला डॉक्टर पत्रिवार यांच्या चारचाकी वाहनावर झाड कोसळल्याने चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे .
सुदैवाने कोणतीही जिवित हानी झाली नाही.
रुग्णाला रेफर करण्यासंदर्भात डॉ.पत्रीवार एम एच ३४ बी आर ८८४३ ह्या चारचाकी वाहनाने ग्रामीण रुग्णालय गोंडपीपरी येथे आले.
चारचाकी वाहन रुग्णालयाच्या प्रांगणात उभी करून ठेवली होती. काम आटपून परत जाण्यासाठी निघाले असता वाहनाच्या अगदी जवळ येताच रुग्णालयाच्या पटांगणातिल झाड कार वर पडल्याने ते थोडक्यात बचावले.मात्र यात त्यांचे चारचाकी वाहन क्षतीग्रस्त झाले असून वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.
ग्रामीण रुग्णालय गोंडपीपरी येथे गावखेड्यातिल बरेच नागरिक उपचारासाठी येत असतात.काही रुग्णाना भरती सुद्धा ठेवण्यात येते. बरेच रुग्ण ह्या पटांगणात फेरफटकाही मारत असतात.सुदैवाने झाड कोसळले तेव्हा कुणीच पटांगणात फिरत नसल्याने मोठी दुर्घटना टळली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close