ताज्या घडामोडी

संतोष रागीट यांची अविरोध निवड

माजी आ.सुदर्शन निमकर यांनी केले रागीटचे अभिनंदन!

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी

चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातील चुनाळा या 13 सदस्यीय ग्रामपंचायत मध्ये सरपंच बाळू वडस्कर यांच्या नेतृत्वात 13 पैकी 13 सदस्य विजयी झालेले होते. दरम्यान वार्ड क्रमांक 3 मधून निवडून आलेले राजू किणेकर यांचे मागील वर्षी दुःखद निधन झाले होते . त्यामुळे रिक्त झालेल्या या जागेच्या पोटनिवडणूकीत युवा कार्यकर्ता संतोष रागीट यांची अविरोध निवड झाली. आज रविवार दि. 14 मे 2023 ला माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य संतोष रागीट यांची अविरोध निवड झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. या वेळी ग्रामपंचायत चुनाळाचे सरपंच बाळू वडस्कर, राजुरा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित उपसभापती संजय पावडे, सेवा सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष कृष्णा पोटे, भाजपा पंचायत राज व ग्रामविकास प्रदेश सह संयोजक प्रदीप बोबडे, ग्रामपंचायत सदस्य राकेश कार्लेकर, उषा करमनकर, वंदना पिदूरकर, संतोषी निमकर, सुवर्णा वाडसकर, सेवा सहकारी संस्था चुनाळा संचालक मनोहर निमकर, बाबुराव निखाडे, किशोर रागीट, बापूजी निमकर, परमेश्वर वडस्कर, प्रभाकर साळवे, अरुणा डाहूले, अनिता मासिरकर, सुरेश इसनकर, अक्षय वडस्कर, सुरेंद्र निखाडे, वयोवृद्ध जेष्ठ नागरिक जानबा पाटील वडस्कर आदीं उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close