ताज्या घडामोडी

सुर्डी प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्या

आमच्या भगिनीला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा चालू ठेवणार-जुनेद पटेल

जिल्हा प्रतिनिधी :अहमद अन्सारी परभणी

माजलगाव तालुक्यातील सुरुडी येथे नऊ वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करणार्‍या नराधमास कठोर कारवाई करण्यात यावी म्हणून आज जिल्हाधिकार्यालय बीड येथे जुनेद भैय्या फॅन्स क्लब च्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की ग्रामीण पोलीस स्टेशन माजलगाव येथे दि.13/07/2021 रोजी र्पष्ठ क्रमांक 0176/2021मध्ये आरोपी पुरुषोत्तम श्रीराम घाटुळ रा सुर्डी ता माजलगाव जि बीड ह्याच्या विरोधात भादवी कलम 376(इ) व बालकांचे लैंगिक अपराधा पासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4,5 व 6,10 नुसार ग्रामीण पोलीस स्टेशन माजलगाव येथे गुन्हा नोंद करण्यात आला. असे की पीडित अल्पवयीन मुलगी नऊ वर्षाची असून आरोपीच्या अत्याचारामुळे गंभीर दुखापत झाली व आती रक्तस्त्रावामुळे जिल्हा शासकीय रुग्णालय बीड येथे दाखल करण्यात आली आहे. तिची परिस्थिती गंभीर आहे तरीसुद्धा सदरहू गुण्यातील आरोपीला मा न्यायालयासमोर समक्ष हजर करून पी.सी.आर मागून सखोल चौकशी करण्याची गरज असताना. तपास अधिकारी यांनी पी.सी.आर ची मागणीच केली नाही. व सरळ सरळ आरोपीला जामिनीसाठी रस्ता मोकळा करून दिला आहे. म्हणून माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशनची भूमिका संशयास्पद असल्याचे दिसून येते. आम्ही खालील या निवेदनाद्वारे अशी मागणी करता आहोत की..(1) सदर प्रकरणातील तपास अधिकारी यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करुन दंडित व निलंबित करण्यात यावे. (2) आरोपीस कायम निकाल लागे पर्यंत मा न्यायल्याच्या कोठडीत ठेवुन जलदगतीने कोर्टात प्रकरण चालवण्यासाठी शासन स्तरावर योग्य ती कारवाई करावी.(3)सदर प्रकरणाचा तपास तर योग्य त्या सक्षम अधिकाऱ्याला घेऊन प्रकरणात विष्पक्ष तपास करावा. अशी मागणी करण्यात आली. यावेळी उपस्थित शेख जुनेद बंन्नुपटेल, बेग समीर, पठाण शहारुख हे होते. प्रतिनिधी:— अहमद अन्सारी पाथरी परभणी (बातमी माजलगाव ता.माजलगाव जि.बिड)

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close