ताज्या घडामोडी

युवकांनी दिले जखमी माकडाला जिवदान

पुयारदंड येथील घटना

ग्रामीण प्रतिनिधी : विलास दिघोरे भिसी

भिसी पासुन अगदी तिनं – चार किलोमीटर अंतरावर असलेल्या पुयारदंड येथील युवकांनी जखमी माकडाला जिवदान दिले.
सोमवार च्या रात्री पुयारदंड या गावी वडाच्या झाडाखाली विजेच्या धक्क्याने माकड जखमी झाला. त्याला उठता व चालता येईना.मुक्या प्राण्याची आर्त हाक युवकांनी ऐकली आणि तात्काळ वनविभागाला कळविले.वनविभागाची चमु पुयारदंडमध्ये दाखल झाली.माकडाला भिसी वनविभागात नेऊन पशुसंवर्धन विभागाकडून उपचार करण्यात आले.यावेळी अतुल गावंडे , प्रफुल्ल राजुरकर ,हर्षल वटाणे , अजय गावंडे, सचिन घोडमारे ,सोहम गवळी , राहुल फलके,सौरभ फलके,गौरव निब्रड आदी युवकांनी जखमी माकडाला वाचविण्यासाठी मदत केली.त्यांच्या मदतीमुळे तिकडे कौतुक होत आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close