ताज्या घडामोडी

तारसा खुर्द येथील प्रभू सदन शेत शिवारात रोव्हण्याचे चिखल करताना ट्रॅक्टर पलटल्याने चालकाचा जागीच मृत्यू

ग्रामीण प्रतिनिधी- महेश शेंडे विठ्ठलवाडा

गोंडपीपरी तालुक्यातील तारसा खुर्द येथे प्रभू सदन चर्च असलेल्या शेत शिवारात रोव्हण्याचे काम सुरू आहे.त्या कामावर चंदनखेडी येथील प्रमोद गेडाम वय अंदाजे 36 वर्ष व्यक्ती आपल्या कुटूंबासह सालगडी राहून काम करीत होता.
प्रभू सदन तारसा येथील कामकाज पाहनाऱ्या फादर च्या देखरेखे खाली तो काम करीत होता. प्रभू सदन च्याच मालकीची असलेल्या ट्रॅक्टर वर ट्रक्टर चालक म्हणून कार्यरत होता. अश्यातच आज दि.19जुलै रोज सोमवारला शेतशिवारात रोवणीचे काम सुरू असताना शेतात चिखल करताना ट्रॅकर बांधीत फसली. बल्ली लावून ट्रक्टर बांधीतून काढण्यात आली. आणि दुसऱ्या बांधीत ट्रॅक्टर नेत असताना लावलेली बली काढण्याचे विसरून गेल्याने ट्रक्टर ला लावलेली बल्ली तिथेच अडकून राहल्याने ट्रक्टर
पलटल्याने सदर अपघात घडला.या अपघातात चालकाच्या अंगावर ट्रॅक्टर पलटल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दवी घटना घडली आहे.
त्याच्या पच्यात 2 मुली व एक मुलगा असा आप्त परिवार असून त्याच्या अचानक जाण्याने कुटूंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.
मृतकाचे शव विच्छेदनासाठी सामान्य रुग्णालय आष्टी येथे नेण्यात आले असून पुढील तपास आष्टी पोलीस करीत आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close