ताज्या घडामोडी

खडसंगी येथील युवकाची आत्महत्या

तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुर

खडसंगी येथील साई बिकानेर व दुध डेरी चे मालक याने आपल्याच राहत्या घरी गळफास लाऊन आत्महत्या केली.
आत्महत्या करणारे बिकानेर चे मालक संदीप चौधरी वय 25 वर्ष असुन ते मुळचे राजस्थान मधील आहेत खडसंगी येथे 4 वर्षापासुन वास्तव्यास आहेत दिनांक 15/ 7 / 2021 ला रात्री त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.आज सकाळी 10 वाजता दरम्यान एक युवक त्याच्या घराशेजारी ऊभा असतांना संदीप चा फोन वारवांर वाजत होता पण तो फोन उचलत नव्हता म्हणुन तो युवक फोन का उचलत नाही म्हणन त्याच्या घरी खिडकीतुन पाहीले असता संदीप चौधरी हा गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समजले त्या युवकाने लगेचच खडसंगी येथील पोलीस पाटील यांना सांगीतले पोलीस पाटलांनी चिमुर पोलीस स्टेशनला फोन करुन आत्महत्येची माहीती दिली चिमुर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करुन शव विच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय चिमुर येथे पाठवण्यात आले आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही पुढील तपास चिमुर पोलीस करीत आहेत.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close