ताज्या घडामोडी

आमदार बाबाजाणी दुर्राणी यांचे वाढदिवसानिमित्त पाथरी बाजार समीतीच्या गोडाऊन व धान्य चाळणी संचाचा लोकार्पण सोहळा संपन्न

१९ शेतकऱ्यांना उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार देऊन केला सन्मान.

जिल्हा प्रतिनिधी :अहमद अन्सारी परभणी

शेतकऱ्यांनी कमी खर्चात जास्त उत्पादनाचे तंत्र अवगत करून कष्टाने शेतीला वाहुन घेणारा शेतकरी निश्चितच समृद्ध होतो असे प्रतिपादन आ.बाबाजाणी दुर्राणी यांनी केले.राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे व पाथरी कृषी उत्पन्न बाजार समिती यांचे संयुक्त विद्यमाने निर्माण केलेल्या १ हजार मेट्रिक टन धान्य क्षमतेचे गोडाऊन व चाळणी संच चा लोकार्पण सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते.
पाथरी कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्डात आ.बाबाजाणी दुर्राणी यांचे वाढदिवसाच्या औचित्याने १५ जुलै रोजी दुपारी २ वा. पाथरी बाजार समितीने स्वनिधी व कृषी पणन मंडळ पुणे यांचे संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांचा माल सुरक्षीत रहावा यासाठी १ हजार मेट्रिक टन क्षमतेचा १ कोटी दहा १० रुपयेचे बांधलेले गोडाऊन व धान्याचा दर्जा चांगला करणे परीणामी चांगला भाव मिळावा या हेतूने बाजार समितीच्या वतीने ६५ लाख रुपयांचा चाळणी संचाचे लोकार्पण उद्घाटक तथा सत्कारमुर्ती आ.बाबाजाणी दुर्राणी यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे,सहाय्यक निबंधक माधव यादव,गट विकास अधिकारी सुहास कोरेगांवे,बाजार समीती सभापती अनिलराव नखाते,ओबीसी सेल चे जिल्हाध्यक्ष नानासाहेब राऊत,मानवत बाजार समीती सभापती पंकज आंबेगांवकर, दत्तराव पावडे,माजी सभापती दादासाहेब टेंगसे,अँड मुंजाजी भाले पाटील यांची उपस्थिती होती आ.बाबाजाणी दुर्राणी म्हणाले की,शेतकऱ्यांनी आधुनिक शेती तंत्रज्ञान आत्मसात करावे. पाथरी तालुक्यात पाण्याची मोठी उपलब्धता आहे.प्रत्येक शेतकऱ्यांनी उत्तम शेती व निगडित पुरक व्यवसाय करून आपली आर्थिक उन्नती करावी असे अवाहन केले या शिवाय धान्याला योग्य भाव मिळत नसेल तर हे धान्य नवनिर्मीत गोडाऊन मध्ये ठेवावे व धान्याचा दर्जा चांगला होणेसाठी चाळणी संचाचा उपयोग घ्यावा असे आ.दुर्राणी म्हणाले.
तालुक्यातील उत्कृष्ट शेती व शेती पुरक व्यावसाय करणाऱ्या १९ शेतकऱ्यांना उत्कृष्ट शेतकरी पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून त्यांचे कौतुक केले.
यावेळी जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे म्हणाले की,आ.बाबाजाणी दुर्राणी , सभापती अनिलराव नखाते व सर्व संचालक मंडळानी पाथरी बाजार समीती ला मराठवाड्यात आदर्श स्थान मिळवू दिले हि बाब निश्चितच कौतुकास्पद आहे.या बाजार समीतीचे प्रशासन शेतकऱ्यांसाठी सुदैव आहे तर कोरोना सेंटर व शासनाला मदत निधी देऊन एक प्रकारे दायीत्व निभावले आहे असे ते म्हणाले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे संयोजन सभापती अनिलराव नखाते, उपसभापती एकनाथराव शिंदे,सचिव बि.जी.लिपने संचालक माधवराव जोगदंड,प्रभाकर शिंदे,बाळासाहेब कोल्हे,सुरेशबप्पा ढगे,लहुराव घांडगे,रूस्तुमराव झुटे,गणेशराव घुंबरे,नारायणराव आढाव,राजेश्वर गलबे,भगीरथ टाकळकर,एकनाथ सत्वधर,दगडुबा दुगाने,विश्वांभर साळवे,बाबासाहेब कुटे,सय्यद गालेब,आश्रोबा शिंदे यांनी केले आहे.
प्रास्ताविक सभापती अनिलराव नखाते यांनी केले तर सुत्रसंचालन गोपाळ आम्ले यांनी केले.या कार्यक्रमास पाथरी तालुक्यातील शेतकरी ,व्यापारी बांधवांची उपस्थिती होती.
उत्कृष्ट शेतकरी पुरस्काराने गौरविण्यात आलेले १९ शेतकरी उत्तम शेती व पुरक व्यावसाय केलेल्या शेतकऱ्यांचा शाल ,श्रीफळ,सन्मानचिन्ह व वृक्ष देऊन गौरव केला या मध्ये शेख खयुम खेर्डा (दुग्ध व्यवसाय),वैभव खुडे बोरगव्हाण (रेशीम व ज्वारी),बाबासाहेब रणेर बाभळगांव राज्य शासन कृषी भुषण पुरस्कार प्राप्त(शेंद्रीयशेती),सुदाम कोल्हे कासापुरी (पपई) सरपंच शेख खयुम बाबूलतारा (ऊस),अंकुश घांडगे पाथरगव्हाण बु.(गव्हु,तालूका प्रथम पुरस्कार प्राप्त)वचिष्ट मोरे तुरा (पपई),ऋषीकेश कुटे वडी( मत्स व शेळीपालन)किरण महाडीक जैतापूरवाडी (टरबूज व पपई),महादेव जगताप चाटे पिंपळगाव (पपई व टरबूज),माधव आढाव बानेगांव(प्रगतशील शेतकरी),शिवाजी झुटे जवळा झुटा (ज्वारी तालुका प्रथम पुरस्कार प्राप्त),सुरेश वाकणकर नाथरा (हरभरा प्रथम पुरस्कार प्राप्त),उदय देशमुख मिरखेल (प्रगतशील शेतकरी),गंगाधरराव गायकवाड रेणापूर (प्रगतशील शेतकरी)बाळासाहेब कोल्हे कासापुरी (प्रगतशील शेतकरी),अनिता हारकळ रेणाखळी (प्रगतशील शेतकरी)नितीन इंगळे बोरगव्हाण(प्रगतशील शेतकरी),गोविंदराव आम्ले खेर्डा (सोयाबीन) यांचा सामावेश आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close