ताज्या घडामोडी

नागभीड नगर परिषदेवर, पंचायत समिती परिसरातील नागरिकांचा हल्ला बोल

ग्रामीण प्रतिनिधी :कु. कल्यानी मुनघाटे मिंडाळा ता.नागभीड

पंचायत समिती परिसर प्रभाग क्र. २ मधील नागरिकांनी समस्यांचा पाढा वाचण्यासाठी नागभीड नगर परिषद वर नागरिकांनी हल्ला बोल केला. नगर परिषद नागभीड च्या मुख्य प्रवेश द्वारावर एकत्र येऊन नगर परिषदेचा निषेध व्यक्त करत घोषणा दिल्या. त्यानंतर मुख्याधिकारी यांना निवेदन सादर करण्यासाठी गेले असता मुख्याधिकारी उपस्थित नसल्याने प्रशासकीय अधिकारी श्री. लोंढे साहेब यांना समस्या चे निवेदन देऊन समस्येवर चर्चा केली. पंचायत समिती परिसरामध्ये प्राथमिक सुविधाही ( नाली बांधकाम, सिमेंट रस्ते, नळ सुविधा, वीज) पुरेशा प्रमाणात झालेल्या नसल्याची जाणीव करून दिली. या परिसरातील मंदिरालगत जवळपास ३५०० चौ. फुटाची खाली भुखंड ले आऊट धारकाने नगर परिषदेला, विकास करण्यासाठी हस्तांतरित केली जेणेकरून परिसरातील वयोवृद्ध नागरिक तसेच लहान बालक या जागेवरती फिरू शकतील, खेळू शकतील पण नगर परिषदेने विकास तर दुरच साधे कंपाऊंड सुध्दा या खाली भुखंडात केले नसल्यामुळे, खाजगी बांधकाम धारक या जागेचा वापर गिट्टी, रेती,विटा इत्यादी ठेवण्यासाठी रात्री बे रात्री अवजड मालवाहू वाहने घेऊन या ठिकाणी येतात त्यामुळे हा पूर्ण भुखंड चिखलमय झालेला आहे, आणि बऱ्याचदा अवजड वाहनांमुळे परिसरातील विजेचे जिवंत तार तुटून रस्त्यावर पडून परिसरातील वीज खंडित होत असते.
तसेच या प्रभागात रिकामे भुखंड अनेक वर्षांपासून पडित असुन त्याला तलावाचे स्वरूप झाले असून पावसाळ्यात पाणी साचून नागरिकांच्या इमारती ला धोका निर्माण झाला आहे. तसेच अतिवृष्टीमुळे भुखंडातील पाण्याचे निस्तारण होत नसल्याने विषारी सरपटणारे प्राणी (साप विंचू)व जंतू( किटक, मच्छर ई.)यांचा त्रास होत असल्याने नागरिकांना अनेकदा गंभीर आजारांना बळी पडावे लागते. ही बाब नगर परिषद पदाधिकार्यांना लक्षात आणून दिली आहे . या व्यतिरिक्त रस्त्यावर अतिक्रमण, सांडपाणी व्यवस्थापन, रस्ते दुरूस्ती, प्रदूषण यावर नगर परिषद चे लक्ष वेधण्यात आले.
पंचायत समिती परिसरा मधील समस्येसंबंधाने नगर परिषद नागभीड चे उपाध्यक्ष श्री गणेश तर्वेकर यांच्या दालनात प्रत्यक्ष भेटून समस्या वर लक्ष वेधले असता उपाध्यक्ष यांनी नगर परिषद ला येणाऱ्या व थांबलेल्या निधी चा पाढा वाचला. पण प्रत्यक्षात प्रभागातील जनतेच्या समस्या प्राथमिक स्वरूपाच्या असुन आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असल्याने तातडीने दुर कराव्यात याव्याअशी मागणी करण्यात येऊन पुर्तता न झाल्यास आंदोलनाचा ईशारा देण्यात आला. इतर प्रभागात मात्र विकासाच्या दृष्टीने कामे केली जातात.आणि पंचायत समिती परिसराच्या बाबतीत मात्र दुजाभाव केल्या जात असल्याने दालनात उपस्थित श्री गौतम राऊत (नगर सेवक प्रभाग क्र. २) यांच्या अकार्यक्षमते बद्धल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
त्या अनुषंगाने प्रशासकीय अधिकारी व अभियंता यांनी प्रभागात भेट दिली व प्रत्यक्ष पाहनी केली. व सांडपाणी निस्तारण, नाल्या सफाई ,कच्या नाल्या ,व सार्वजनिक मंदीराच्या जागेवर तारेचे कंपाऊंड च्या कामाला लगेच सुरुवात करण्यात येईल. असे आश्वासन दिले. पण प्रत्यक्ष सुविधा मिळाल्या शिवाय काही खरे नाही. आश्वासन पुर्ण न झाल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा नागरिकांतर्फे दिला
या प्रसंगी श्री मनोज लडके, श्रीकांत पिसे, अनमूलवार सर, ठाकरे सर, समर्थ सर, उरकुडे सर, आशिष मिसार, आशिष बावनकर, दांडेकरजी, आटमांडे सर, सचिन देशमुख, कैलाश बोरीकर, अमोल देशमुख, बोरकुटेजी, मेंढे सर, योगेश वाढई, अजय वरखडे, गेडेकरजी, श्रीमती जांभुळकर, श्रीमती नागोसे, सौ. फटींग, सौ. अर्चना समर्थ,सौ. दांडेकर, सौ. अनिता बोरकुटे,सौ. संगीता लडके,सौ. नागापुरे,सौ. विद्या मोरांडे,सौ. सुवर्णा टिपले इत्यादी नागरिक उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close