ताज्या घडामोडी

गोंडपीपरी वन तलावाजवळ ट्रॅक व बस ची समोरा समोर धडक

बस चालकासह प्रवाशी जखमी

ग्रामीण प्रतिनिधी :महेश शेंडे विठ्ठलवाडा

गोंडपीपरी वन तलावा जवळ आज दि.8 जुलै रोज गुरवारला ट्रॅक आणि बस ची समोरासमोर धडक झाल्याने बस चालकासह प्रवाशी किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली आहे.
अहेरी-चंद्रपूर मार्गावर गोंडपीपरी वन तलावाजवळील वळणावर समोरासमोर बस व ट्रक ची धडक झाली.
या धडकेत बसचालकासह काही प्रवाशी किरकोळ जखमी झाले असून जखमी बसचालक व प्रवासी यांना उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय गोंडपीपरी येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.
किरकोळ जखमी झालेल्या प्रवाश्यांना ग्रामीण रुग्णालयत उपचार करून सुट्टी देण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली .बसचालकाच्या दोन्ही पायांना दुखापत झाल्याने मलमपट्टी करून त्यांनाही सायंकाळचे सहा वाजता सुट्टी देण्यात आली आहे.
अहेरी-चंद्रपूर मार्गावर प्रवाशी भरून जात असताना अचानक गोंडपीपरी जवळील वन तलावाजवळ सदर अपघात घडला. एम.एच.40 वाय 5411 क्रमांकाची परिवहन मंडळाची बस गोंडपिपरी हुन प्रवाशी घेऊन चंद्रपुर कडे जात असताना गोंडपीपरी वन तलावाजवळ येतच समोरून येणाऱ्या एम.एच. 34 ए.बी. 9335 ट्रकने धडक दिली.
या धडकेत बसचालक व बस मधील प्रवाशी जखमी झाले आहेत.
सदर घटनेची माहिती गोंडपीपरी पोलिस स्टेशनला देण्यात आली असता गोंडपीपरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
सदर ट्रक पोलीस स्टेशन च्या समोर लावण्यात आला असून
पुढील तपास गोंडपीपरी पोलीस पोलीस करीत आहेत.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close