ताज्या घडामोडी

ट्रक अपघातात आर डी संकलन करणाऱ्याचा मृत्यू

ट्रक फरार नागभीड येथील घटना .

ग्रामीण प्रतिनिधी : कल्यानी मुनघाटे मिंडाळा ता.नागभीड

नागभीड पोलिस स्टशन अंतर्गत टिव्हींकल इंग्लिश स्कुल जवळ महा मार्गावर अज्ञात ट्रक च्या धडकेत आरडी संकलन करणाऱ्या इसमाचा मृत्यू तर ट्रक फरार.
निलेश पांडूरंग गेडाम वय ४१ वर्ष रा.नवखळा असे मृतकाचे नाव असून . निलेश हा एका खाजगी पत संस्थेचा आर डी संकलन करणारा कर्मचारी होता . आज सायंकाळी तो आर डी संकलन करण्यासाठी सायकलीने तुकुम येथे गेला होता.परत येताना रात्री ८ च्या सुमारास अज्ञात ट्रक ने त्याला मागुन धडक दिली . यात निलेशचा जागीच मृत्यू झाला.व ट्रक फरार झाला . याची माहिती पोलिसांना मिळताच घटना स्थळ गाठून पंचनामा केला.व शव उत्तरीय तपासणी साठी ग्रामीण रूग्णालय नागभीड येथे पाठविण्यात आले. अज्ञात ट्रक चालका विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला मृतकाला आई ,पत्नी , मुलगा व मुलगी असा मोठा आप्त परिवार असून पुढील तपास नागभीड पोलिस करीत आहेत .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close