ताज्या घडामोडी

साक्षर पँथर आर्मी सोनपेठ कडुन शिवसेना आमदार संजय गायकवाड बुलढाणा यांचा विधानसभा सदस्य पद रद्द करण्याबाबत तहसीलदारांना निवेदन

जिल्हा प्रतिनिधी : अहमद अन्सारी परभणी

साक्षर पँथर आर्मी सोनपेठ यांचे कुडून बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या विरुद्ध तहसीलदाराना निवेदन देन्यात आले.शिवसेना आमदार संजय गायकवाड बुलढाणा यांनी जाहीर पणे अनुसूचित जाती जमाती वर दरोड्याचे गुन्हे दाखल करा 20/20 गावांच्या टोळ्या करून त्यांना त्यांची जागा दाखवून द्या असे चिथावणीखोर व समाजामध्ये तेड निर्माण करणारे वक्तव्य करून केवळ अनुसूचित जाती जमतीचाच नवे तर न्याय देवतेचा देखील अवमान केला आहे.

अट्रोसिटी चा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचा निकाल न्यायालय देईल ही लोकशाहीची प्रणाली आहे पण अगोदरच पीडित कुटुंबियाने खोटी फिरीयाद दिली म्हणून त्यांच्यावरच दरोड्याचा गुन्हे दाखल करा असे जाहीर वक्तव्य करणे म्हणजे लोकशाहीचा न्याय देवतेचा आणि विधिमंडळाचा अवमान होईल अश्या देश विघातक मनोवृत्तीच्या संविधान विरोधी व्यक्तीस विधिमंडळाच्या विधानसभा पदावरून पदमुक्त करण्यात यावे व आजीवन निवडणूक लढण्यास बंदी घालण्यात यावे. असे निवेदनाद्वारे साक्षर
पँथर आर्मी सोनपेठ यांचे कडून तहसीलदांराना निवेदन देण्यात आले .

यावेळी साक्षर पँथर आर्मी चे महाराष्ट्र महासचिव आशिष भैया मुंडे शहराध्यक्ष केरबा रंजवे कार्याध्यक्ष समाधान रणखांबे सामाजिक कार्यकर्ते भगवान वाघमारे ग्रामपंचायत सदस्य उकळी गौतम मुजमुले अभिजीत तूपसमिंद्रे , सुरेश चव्हाण व कार्यकर्ते उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close