ताज्या घडामोडी

विश्वशांती ग्रामसेवा संघ विठ्ठल वाडा तर्फे नवनियुक्त महिला तालुका अध्यक्ष रेखा रामटेके यांचा साडी-चोळी देऊन केला सत्कार

ग्रामीण प्रतिनिधी :महेश शेंडे विठ्ठलवाडा

गोंडपिपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्या सौ. रेखा सुधाकर रामटेके याची गोंडपीपरी तालुक महिला काँग्रेस अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
या प्रसंगाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान संचालित विश्वशांती ग्रामसेवा संघ विठ्ठलवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारला नवनियुक्त अध्यक्षा रेखा रामटेके यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
त्याप्रसंगी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान संचालित विश्वशांती ग्रामसेवा संघ विठ्ठलवाडा येथील महिला पदाधिकाऱ्या कडून रेखा रामटेके यांचा साडी चोळी आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी सुरेखा पिदुरकर, कमला लोणारे सचिव ,संघाचे पदाधिकारी शैला चोपावार, वैशाली लोहकरे, अर्चना चंद्रगिरीवार, माधुरी रामटेके ,पवार मॅडम आणि संघातील सदस्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्कार प्रसंगी बोलताना रेखा रामटेके म्हणाल्या की,
ग्राम सदस्य म्हणून प्रभागातील विविध विकास कामांबरोबरच अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी सदैव तत्पर राहणार आहेच त्या सोबतच काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्याने तालुक्यातील महिलांच्या न्याय हक्कासाठी झटून महिला विषयी चे कोणतेही प्रश्न मार्गी लावण्यासाठी माझे प्रथम प्राधान्य राहील ,
विशेषतः महिलांसाठी शासनाच्या विविध उपक्रमाच्या माध्यमातून कार्यक्रम राबविण्याचा मानस असल्याचे सौ.रेखा रामटेके यांनीनी बोलताना सांगितले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close