ताज्या घडामोडी

विठ्ठलवाडा येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोरील खोदलेले खड्डे देत आहेत अपघातास आमंत्रण

ग्रामीण प्रतिनिधी :महेश शेंडे विठ्ठलवाडा

विठ्ठलवाडा येथील चक्क ग्रामपंचायत कार्यालयासमोर खोदलेले खड्डे अपघातास आमंत्रण देत आहेत. विठ्ठलवाडा येथील वॉर्ड क्र.03 येथील वस्तीसाठी नवीन पाणी पाइप लाईन टाकण्याचे काम मागील दोन महिन्यात पूर्ण झाले.ही पाइप लाईन जवळपास 150 ते 200 मीटर पर्यंत खोदण्यात आली.खोदलेली पाइप लाइन पूर्णपणे बुजविण्यात आलेली नाही.जवळपास 5 ते 6 ठिकाणी खड्डे आहेत.आणि ते सुद्धा चक्क ग्रामपंचायत कार्यालयासमोर. खोदून ठेवलेल्या खड्यातील माती मुख्य रस्त्यावरच टाकून आहे.छोटा पाऊस जरी आला तर मुख्य रस्त्यावर चिखल होते.तेव्हा एखादी गाडी जरी आली तरी घसरून पडण्याचा धोका असतो.150 ते 200 मीटर खोदण्यात आलेली पाइप लाईन मुख्य रस्त्याला लागून आहे.हा मार्ग नेहमीच वर्दळीचा असतो.याच मार्गाने नेहमी अवजड वाहने व प्रवाशी वाहनांची नेहमी वर्दळ असते.ग्रामपंचायत कार्यालयासमोरच मागील वर्षी एक ट्रक फसला या फसलेल्या ट्रकमुळे 20 ते 30 मीटर नाली पूर्णतः खचली तेव्हापासून ही नाली बांधण्यात आलेली नाही.एका बाजूला खोदलेले खड्डे आणि दुसऱ्या बाजूला खचलेली नाली यामुळे दोन वाहने एकमेकांसमोर आली तर अपघात होणे निश्चित असे चित्र आहे.तेव्हा अपघात झाला तरच खोदलेले खड्डे बुजवणार काय आणि नाली बांधणार काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close