ताज्या घडामोडी

वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या सुशी(दाबगाव) वैशाली मांदाडे हिच्या वारसदारांना मध्यवर्ती बँकेकडून आर्थिक मदत

अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी दिला चेक

तालुका प्रतिनिधी:हेमंत बोरकर मुल

मुल तालुक्यातील मौजा सुशी(दाबगाव) येथील महिला वैशाली विलास मांदाडे ही सकाळी सरपणासाठी(जळाऊ काड्या) आणण्यासाठी गावाला लागूनच असलेल्या वनविकास महामंडळाच्या जंगलात डोंगरहळदी बीटातील केळझर राउंड कक्ष क्रमांक ५२६ मध्ये जाऊन काड्या जमा करीत असतांना जंगलात दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने महिलेवर हल्ला करून वैशाली मांदाळे हिला जागीच ठार केल्याची घटना नुकतीच घडली होती घटनेची माहिती सुशी ग्रामस्थांनी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा माजी जि. प. अध्यक्ष संतोषसिंह रावत यांना दिली असता मध्यवर्ती बँकेच्या शेतकरी कल्याण निधी मधूनव दहा हजार रुपये मृतक वैशाली मांदाडे हिचे वारसदार पती विलास व दोन लहान मुली सुहानी आणि शिवानी यांना घरी जाऊन सुशी वासीय ग्रामस्थांच्या उपस्थितीत बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे हस्ते देण्यात आले . वारसदारांना आर्थिक मदतीचा चेक देतांना अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे समवेत तालुका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती घनश्याम येनुरकर,संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राकेश रत्नावार, गुरु गुरनुले, सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष रामभाऊ पाटील बुरांडे, सदश जोगेश्वर घोंगडे, विषवनाथ ठाकरे, राजेंद्र वाढई, रामदास मांदाडे, किशोर पिपरे, रवींद्र पिपरे, राजेश गुरनुले, मोहन बुरांडे,माधव मांदाडे,जयंत मांदाडे, आणि ग्रामस्थ उपस्थित होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आता पर्यंत कँसरग्रस्त,हार्ट अटॅक, दुर्धर गंभीर आजार,अशा रुग्णांना उपचारासाठी चाळीस हजार तर साप, विंचू, चावून व विजपडून मृत्यू झालेले,धानाचे पुंजने जळालेल्या नुकसान ग्रस्तांच्या मदतीसाठी सहकारी मध्यवर्ती बँकेने अनेकांना आर्थिक मदतीचा आधार दिला आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close