ताज्या घडामोडी

खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेस व न्यू आदर्श बहुउद्देशीय सामाजिक संस्था तर्फे वृक्षारोपण

तालुका प्रतिनिधी : ग्यानीवंत गेडाम वरोरा

राष्ट्रवादी काँग्रेस च्या नेत्या व बारामती लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांचा वाढदिवस वृक्ष रोपण करुन साजरा करण्यात आला . राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष वरोरा तालुका अभिजित कुडे व मिञ परीवार तर्फे उखर्डा येथील शंकर मंदिर परिसर येथे वृक्षारोपण करण्यात आले . चंद्रपूर जिल्ह्यात प्रदूषणा मुळे वायू प्रदूषण भरपूर प्रमाणात होत आहे. त्या मुळे पर्यावरणाचा समतोल राखला जात नाही….. म्हणुन वृक्ष रोपण करणे व पर्यावरणाचा समतोल राखणे काळाची गरज आहे त्याचाच एक भाग म्हणुन न्यू आदर्श बहुउद्देशीय सामाजिक संस्था “माझे गाव हिरवे गाव” अभियान अंतर्गत विवीध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येते . संस्थापक अध्यक्ष अमोल घोटेकर यांच्या संकल्पनेतून दरवर्षी वृक्ष लागवड करण्यात येते. यावर्षी पावसाळ्याला सुरूवात झालेली आहे आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसा निमित्त उखर्डा येथील शंकर मंदिर परिसर येथे करंजी निंब सदाहरितव भरपूर ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांची लागवड करण्यात आली. या प्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष वरोरा तालुका अभिजित कुडे , वीलास कुडे ,न्यू आदर्श बहुउद्देशीय सामाजिक संस्था सचिव रोशन भोयर, विनोद कोठारे, सहिल पानतावणे , आकाश हीवरकर , गौरव बुचके , रंजीत कुडे , ऋषिकेश कुडे , दीपक कुडे , दीपक पेंदाम, विजय कुडे , विकास पेंदाम , राहुल कुडे व युवक उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close