ताज्या घडामोडी

उपविभागिय अधिकारी पाथरी यांना स्मरण प्रञ

मुख्य संपादक :कु. समिधा भैसारे

एका आरटीआय कार्यकर्त्यांने पाथरी तहसील कार्यालयाकडे विविध मागण्यांचे निवेदन दिले होते. निवेदनावर केलेल्या मागण्याकडे स्पष्ट दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत असल्याने यावर प्रत्युत्तरात काय कार्यवाही करण्यात आली. हे विचारण्यास गेलेल्या आरटीआय कार्यकर्त्यास तहसील कार्यालयात अपमानास्पद वागणूक मिळाली. (तीन/जुन) रोजी माहिती अधिकार कार्यकर्ते अहमद अन्सारी हे आपल्या सहकाऱ्यासह तहसीलदार श्रीकांत निळे यांच्या दालनात पोहोचले होते. यावेळी अहमद अन्सारी यांनी दिलेल्या निवेदनावर काय कारवाई करण्यात आली अशी विचारणा केली असता “बाहेर व्हा चालते व्हा” असे म्हणून हाकलून दिले असल्याचे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. माहिती अधिकार कार्यकर्त्यांला देण्यात आलेली वागणूक अपमानजनक आहे. अशाप्रकारे वरिष्ठ अधिकारीच वागणूक देत असतील तर सामान्य माणसांनी जायचे कुणाकडे असा प्रश्न सर्वसामा?न्यांना नक्कीच पडला असेल?. अशा या मिळालेल्या वागणुकी पोटी माहिती अधिकार कार्यकर्ते अहमद अन्सारी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे न्याय देण्याची मागणी केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्यांनी तहसीलदार श्रीकांत निळे यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पाथरी तहसील कार्यालयात माहिती अधिकार कार्यकर्त्याला अपमानजनक वागणूक मिळाली होती आज दिंनाक 28/06/2021 सोमवार रोजी उपविभागिय अधिकारी पाथरी यांना स्मरण प्रञ देण्यात आले.निवेदनात नमुन करण्यात आले की तहसिलदार यांच्यावर काय कार्यवाही केली त्याची छांयाकीत प्रञ देण्यात यावी व कार्यवाही नाही केली तर का? कार्यवाही नाही केली यांचे उत्तर लेखी स्वरुपात देण्यात यावी म्हणुन आज स्मरण प्रत देताना मराठवाडा अध्यक्ष अहमद अन्सारी शेख अजहर हदगावकर व शेख ईफतेखार बेलदार हे उपस्थित होते

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close