ताज्या घडामोडी

हिंदू जन नायक राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना वरोरा तर्फे गरीब,निराधार, वृद्ध बेघर महिलेला दिला निवारा

तालुका प्रतिनिधी : ग्यानीवंत गेडाम वरोरा

हिंदू जन नायक
सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना वरोरा तर्फे उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे फळ वाटप ,गरजू नागरिकांना मसालेभात जिलेबी वाटप ,निराधार वृद्ध बेघर महिलेला निवारा बांधून देत मा. राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करीत सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.एकीकडे कोरोना मुळे सर्वसामान्यांचे हाल होत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्व स्तरांवर पोहचुन सर्व सामान्य जनतेला मदत करीत आहे.शकुंतला येसंबरे ही वृद्ध निराधार महिला मागील 20 वर्षांपासून उघडयावर राहत होती ,पावसाळ्यात उघडयावर राहायला विशेष त्रास होत होता.भर पावसात छत्री च्या आधारे ही वृद्ध महिला राहत होती.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी प्रशांत बदकी व तालुकाध्यक्ष वैभव डहाने यांच्या निर्दशनास ही बाब येताच त्यांनी या महिलेला निवारा बांधून देण्याचे ठरवले त्यानुसार आज हा निवारा बांधून देण्यात आला.निवारा बांधताना यात प्रणय परिमल,कुणाल गौरकार, कल्पक ढोरे,प्रशांत बदकी तालुका सचिव ,वैभव डहाने तालुकाध्यक्ष व राजू कुकडे जिल्हा उपाध्यक्ष यांनी विशेष सहकार्य केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close