ताज्या घडामोडी

नेरी ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच यांचा हुकुमशाही कारभार

ग्रामीण प्रतिनिधी : रामचंद्र कामडी नेरी

नेरी येथील सरपंच व उपसरपंच यांनी कुठलीही शहानिशा न करता माजी सरपंच रामदास सहारे यांनी पाणी जाण्यासाठी खोदलेली नाली बांधकामाला अवैध ठरवत नालिचे बांधकाम बुजविन्यास लावले.
सविस्तर माहीती अशी की , चार कुंटुब शेजारी राहतात त्या चारही कुंटुबातील व्यक्तींना एक सार्वजनिक रस्ता आहे. त्याच रस्त्याला लागुन डाकेश्वर पिसे यांचे घर आहे. सांडपाण्याची योग्य विल्हेवाट व्हावी व रस्त्यावर चिखल होऊ नये म्हणुन त्यांच्या घराला लागुन कच्च्या नालीचे खोदकाम केले होते त्यावेळी त्यांच्या मुलाने नाली खोदकाम थांबवले होते त्यामुळे नालीचे खोदकाम पुर्ण झाले नाही त्यातच ग्रामपंचायत निवडणुका आल्या व जुनी कार्यकारणी जाऊन नविन कार्यकारणी आली याच काळात ज्यांनी नालीचे काम थांबवले होते त्यांनीच माझ्या घरात नालीचे पाणी जिरते म्हणुन नाली पुर्णपणे बुजवली त्यामुळे त्यांच्या घरामागीली सर्व घरांचे पाणी तिथेच साचुन राहाते व रोग पसरण्याची दाट शक्यता आहे म्हणुन त्या घराजवळील कुटुंबांनी अशी तक्रार ग्रामपंचायत ला दिली असता उपसरपंच म्हणतात आम्ही काहीच करू शकत नाही तुम्हाला जे करायच ते करा.
मागील सरपंच यांनी खोदकाम केलेली नाली बुजविल्या मुळे तिन कुटुंबांना पाण्याच्या विल्हेवाटेचा प्रश्न निर्मान झाला आहे . तो प्रश्न सोडवुन नाली बांधकाम पुर्ण करुन दयावा अशी मागणी त्या तिन कुटुंबीयांकडुन होत आहे .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close