ताज्या घडामोडी

ऑनलाइन नोंद झाली नसल्यामुळे सरडपार हे गाव शासनाच्या योजनेपासुन वंचित

लोकप्रतिनिधिनचे दुर्लक्ष

मुख्य संपादक :कु.समिधा भैसारे

चिमूर तालुक्यातील सरडपार गाव चिमूर नगर परिषद निर्मिती पूर्वी काग गट ग्राम पंचायत मध्ये सामाविष्ट होते, मात्र चिमूर नगर परिषद मध्ये काग व सोनेगांव सामाविष्ट करण्यात आला, त्यामुळे काग ग्राम पंचायत मधील सर्व रेकार्ड चिमूर नगर परिषद ला जमा करण्यात आल्याने सरडपार गांव वाऱ्यावर सोडन्यात आले, वारंवार स्वतंत्र ग्राम पंचायतचा ठराव शासनाकड़े पाठवीन्यात आला पन लोकसंखे अभावि तो प्रस्ताव नामंजूर करण्यात आला, त्यामुळे गावातील नागरिकांना शासनाच्या कोणत्याच योजनेचा लाभ 6 वर्षापासून मिळाला नाही, 11 ऑक्टोंबर चिमूर पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी यानी तहसीदार चिमूर याना पत्र लिहून गावकाऱ्यांच्या मागनी नुसार व ग्रामसभेच्या ठरावानुसार सरडपार हे गाव म्हसली ग्राम पंचायतला सामाविष्ट करण्यात आला पन ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण झाली नसल्यामुळे शासनाच्या योजनेपासुन वंचित राहिला.
चिमूर नगरपरिषदच्या निर्मितीमुळे सहा वर्षापासून शासनाच्या सर्व प्रकारच्या योजनेपासुन सरडपार हे गाव वंचित आहे, या संदर्भात सरडपारवासियांचे। वतीने शाषन प्रशासनाला गावास स्वतंत्र ग्राम पंचायतचा दर्जा मिळावा अथवा म्हसली ग्राम पंचायतला सरडपार ला जोडावे करीता निवदेन देण्यात आले, सरडपार गाव म्हसली ग्राम पंचायतला जोडण्यात आले पन ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण झाली नसल्यामुळे सर्व प्रकारच्या योजनेपासुन दूर राहिले, सरडपार गावची ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करुण गावकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी सरडपार गांववासियांच्या वतीने करण्यात येत आहे

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close