ताज्या घडामोडी
महादवाडी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे एक दिवस काम बंद आंदोलन
ग्रामीण प्रतिनिधी : वृषभ कामडी मोटेगाव
चिमुर तालुक्यातील शेवटच्या टोका वर असलेले महादवाडी या गावत ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांनि केले एक दिवस काम बंद आंदोलन चिमुर पंचायत समिती अंतर्गत अनेक ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांची मागिल काही महिन्या पासुन शासन वेतनाच्या व्यातिरिक्त ग्राम पंचायत च्या हिश्याचि वेतनापोटी देय असलेली उर्वरित पन्नास टक्के रक्कम व राहणीमान भत्ता तसेच GPF चि रक्कम दिलेली नाहि ग्राम पंचायत सचिव वेतन व इतर लाभ देण्यास टाळाटाळ करित आहेत त्या मुळे संबधित कर्मचारी याचे आर्थिक नुकसान झाले आहे त्या मुळे ग्राम पंचायत महादवाडी येतिल कर्मचारी सिद्धार्थ गोमा रामटेके (शिपाई) जनार्दन चागो भागडे (पा.पु) यांनी ग्राम पंचायत सामोर एक दिवस काम बंद आंदोलन करण्यात आले