ताज्या घडामोडी

विठ्ठलवाडा येथील नाली चे बांधकाम करतांनाच नाली कोसळली

ग्रामपंचायतीचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

ग्रामीण प्रतिनिधी : महेश शेंडे
विठ्ठलवाडा

गोंडपीपरी तालुक्यातील मौजा विठ्ठलवाडा येथील वॉर्ड न.3 मध्ये नालीचे बांधकाम सुरू आहे.हे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे सदर नाली बांधकामावर ग्रामपंचायत विठ्ठलवाडाच्या नवनियुक्त सदस्यांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
मागील तीन चार दिवसा पासून नाली बांधकामाला सुरवात झाली आहे.अश्यातच आज दिनांक 17 एप्रिल रोज शनिवारला नालीचे बाधकाम सुरू असतानाच काही वेळातच नाली खचल्याची धक्कादायक बाब घडली असल्याने सदर नालीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याची नागरिकात चर्चा सुरू झाली आहे.मात्र स्थानिक प्रशासन या बाबीकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close