ताज्या घडामोडी

एमपीएससी ची ‘परीक्षा होणारच’ होती ती मुख्यमंत्र्यांना पुढे ढकलावी लागली

ऊपसंपादक :विशाल इन्दोरकर

आजपर्यंत ‘परीक्षा होणारच’ असे ऐकत आलेली एमपीएससी ची दि. ११ / १० / २०२० रोज रविवार ला होणारी परीक्षा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मराठा पुढारींसोबत काल झालेल्या चर्चेंनंतर पुढे ढकलली
ह्या परीक्षेबद्दल मराठा नेत्यांचे आरक्षनाच्या मुद्याावरुन टोकाचे विरोध होते .” वेळ पडल्यास तलवारी काढु” अशा वक्तव्यापर्यंत मराठा नेत्यांचा हा विरोध पोहचलेला दिसला . मराठा समाजास आरक्षणाच्या धोरणात समाविष्ट करुण घेण्यासदर्भात आंदोलने व निदर्शने काही दिवसांपासुन सुरु आहेत . त्या सदर्भात याचीका सुप्रीम कोर्टातही आहे ज्याचा निकाल अजुन लागलेला नाही . तरी , कोर्टामार्फतचा हा लढा मराठा नेत्यांनी रस्त्यावर आणुन शक्ति प्रदर्शन व दबाव गट निर्मान केला . त्यातुनच शासकीय नौकरीतील जागेच्या आरक्षणाचा मुद्दा थेट परीक्षाच होऊ देणार नाही इथपर्यंत आणुन इतर समाजातिल व मराठा समाजातिलही परीक्षार्थ्यांनी काढलेल्या प्रवेश पत्रांचा खर्च , झेराक्स खर्च तसेच कोणी आधीच प्रवास तिकीट केले असल्यास तो खर्च व मानसीक त्रास आणि केन्द्रावर केलेल्या सोई सुविधा हे सर्व वाया गेल्यात ह्याची परीनिती झाली .
आजपर्यंत ही परीक्षा होण्यास काहीच समस्या नव्हती . तिला मराठा नेत्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर मुख्यमत्र्यांना समस्या दिसुन आल्या व त्यांचा सुर बदलला .मा. मुख्यमंत्री ऊद्धवजी ठाकरे ह्यांनी या संदर्भात असे वक्तव्य केले की , काही विद्यार्थ्यांनी त्यांचा अभ्यास न झाल्याचे कळविले व त्यासाठी पुन्हा वेळ मिळावा म्हणुन परीक्षा पुढे ढकलावी अशी विनंती केली . दुसरे , काही परीक्षार्थी कोरोनाग्रस्थ आहेत असेही ते म्हणाले . सध्याच्या परीक्षार्थ्यास पुढली परीक्षा तारखेस वय निर्बधांच्या कारणावरुण परीक्षेपासुन दुर ठेवल्या जाणार नाही . ते परीक्षा देण्यास पात्र राहातील असेही मुख्यमंत्री म्हणाले . कांग्रेस नेते मा . अशोक चौव्हाण ह्यांनी सुद्धा परीक्षा न होण्याचे कारण देतांना सध्याच्या वाढत्या कोरोना काळास जबाबदार ठरविले .
वरील कारणे पाहता असे दिसते की , मराठा नेत्यांनी कोरोनाची समस्या तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासासंदर्भातील चर्चा मुख्यमंत्र्यांसोबत केली असावी . त्यामुळे ऐन परीक्षेच्या तोंडावर मुख्यमंत्र्याना हे कळले की कोरोना वाढीला वेग आलेला आहे आणि विद्यार्थ्यांचे अभ्यास झालेले नाही . इथे असा प्रश्न ऊपस्थीत करावा वाटतो की ज्या विद्या्र्थ्यांना अभ्यासासाठी पुन्हा वेळ हवाय ते ह्या कोरोना टाळेबंदीच्या काळात काय करीत होते? तसेच , ज्यांचा अभ्यास झालेला आहे किंवा जे परीक्षेस तयार आहेत त्यांच्यावर अन्याय तर होत नाही आहे ना? दुसरे , मुख्यमंत्री म्हणतात की काही परीक्षार्थी कोरोनाग्रस्त आहेत . तर तज्ञांच्या मते पुढील काळात कोरोना रुग्ण झपाटयाने वाढण्याची शक्यता आहे . मग ह्या कारणामुळे परीक्षा न होण्याची अनिश्चितता कधीपर्यंत? आणि महत्त्वाचे , मराठा आरक्षण मुद्याचा परीक्षेशी संबध नसतांना व सुप्रीम कोर्टात केस असतांना परीक्षा एका विशिष्ट वर्गासाठी रोखुण धरने कितपत योग्य आहे?
असो. राजकीय आदेश पाळावाच लागेल .’परीक्षा होणारच’ होती ती नंतर ‘कधीतरी होणारच’ , म्हणुन होतकरू अभ्यासु परीक्षार्थ्यांनी कोणत्याही कारणास्तव खचुन न जाता मिळालेल्या अधिक वेळाचा अभ्यासासाठी पुरेपुर वापर करून जोमाने तयारी करावी व परीक्षेत चांगले गुण मिळवुन आपआपली स्वप्ने पुर्ण करावी .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close