ताज्या घडामोडी

ब्रम्हपुरी येथे स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी सर्व सुविधायुक्त अद्यावत व वातानुकूलित ई-ग्रंथालय

तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुर

ब्रम्हपुरी येथील युवावर्गातून भविष्यात आय.ए.एस. व आय.पी.एस. सारखे वरिष्ठ अधिकारी घडावे म्हणून त्यांचेकरिता स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी सर्व सुविधायुक्त अद्यावत व वातानुकूलित ई-ग्रंथालय बांधण्यात येत आहे,
या ई-लायब्ररीचे बांधकामाची अंदाजीत किंमत 7 कोटी 56 लाख 44 हजार रुपये असून पुढील 8 ते 12 महिन्याच्या आत ही सुसज्ज इ-लायब्ररीची इमारत पुर्ण होईल .
जिवनात यशस्वी होण्यासाठी सातत्यपुर्ण कष्ट व सकारात्मक विचारप्रणाली आवश्यक असून शिक्षणाच्या व क्रीडा कौशल्याच्या बळावर देशासाठी व समाजासाठी मोठे कार्य येथील विद्यार्थ्यांच्या हातून घडावे ही अपेक्षा आहे .
याकरिता विद्यार्थ्यांना लायब्ररी तसेच शिक्षणाकरिता आवश्यक सुविधा , खेळाडूंसाठी खेळ मैदाने व इतर सुविधा नामदार विजय वडेट्टीवार साहेब यांच्या नेतृत्वात उपलब्ध करून देण्यात येत आहे .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close