ताज्या घडामोडी

नांदगाव येथील बाजारपेठ व रस्ते निर्मनुष्य

ग्रामीण प्रतिनिधी :अंकुश खोब्रागडे गोवर्धन

कोरोणा चा वाढता प्रभाव लक्षात घेता शासनाने मिनी लाकडावून घोषित केला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सिनेमागृह दुकाने व बाजारात लोकांची जास्त गर्दी होत असल्याने कोरोना चा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरण्याची भीती असल्याने राज्य शासनाने सिनेमागृहे दुकाने व बाजारपेठा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. मूल तालुक्यातील नांदगाव ही ग्रामीण भागातील मुख्य बाजारपेठ आहे. बाजारपेठ बंद असल्याने बाजारपेठेत व रस्ते निर्मनुष्य पाहायला मिळत आहे. कोरोणा चा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने कोरोणाचे कडक निर्बंध लावल्याने नांदगाव येथील बाजारपेठेत शुकशुकाट दिसत आहे.
गोंडपिपरी-मुल-सावली मार्गावरील नांदगाव मुख्य ठिकाण असल्याने ग्रामीण भागातील 20-25 गावातील नागरिक नांदगाव येथे खरेदीसाठी येतात परंतु शासनाने अत्यावश्यक सेवा वगळता सिनेमागृहे दुकाने व बाजारपेठा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे मात्र बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्याने नांदगाव येथील व्यापारी वर्गाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close